Chaturgrahi Yog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होताना दिसतो. येत्या काळात वृषभ राशीत ग्रहांचा संयोग होणार आहे. 1 मे रोजी गुरूने वृषभ राशीत प्रवेश केला असून पुढील वर्षी 2024 पर्यंत या राशीत राहणार आहे. दुसरीकडे मे महिन्यात गुरू अनेक ग्रहांशी संयोग होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार 1 मे रोजी गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी सायंकाळी 6.04 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसंच शुक्र 19 मे रोजी सकाळी 8:51 वाजता या राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय 31 मे रोजी बुध दुपारी प्रवेश करणार आहे. यामुळे 31 मे रोजी चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.
वृषभ राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना व्यवसाय, नोकरी तसेच आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत खूप फायदा होणार आहे. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर तुमची मेहनत आणि काम पाहून तुमचे कौतुक होईल. ऑफिसमध्ये तुमची वाढ आणि बोनस यावरही चर्चा होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो.
या राशीच्या अकराव्या घरात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. परदेश व्यापारातून कामात वाढ होण्यासोबतच भरपूर आर्थिक फायदा होणार आहे. व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाल तेव्हा तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या कालावधीत असे करणे फायदेशीर ठरू शकते.
या राशीच्या पाचव्या घरात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळेल. तुम्हाला भविष्यात फायदा मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना चांगला लाभ मिळू शकतो. भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुम्हाला चांगल्या वेतनवाढीसह बढती मिळू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )