Coconut : नारळ फोडताय? 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या

हिंदू संस्कृतीत महिलांना सहसा नारळ फोडू दिला जात नाही, कारण... 

Updated: Sep 23, 2022, 12:31 PM IST
Coconut : नारळ फोडताय? 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या  title=
Coconut for auspicious blessings good health of childrens kno details

Benefits of Coconut : नारळ... शुभकार्यापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत आणि अगदी अभ्यंग स्नानापर्यंत वापरली जाणारी एक बहुमूल्य गोष्ट. हिंदू धर्मात नारळाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. कोणतीही पूजाअर्चा या नारळाशिवाय अपूर्ण आहे. तर, अनेक सुगरणीचं जेवणही या नारळावाचून अपूर्णच आहे. काहींसाठी नारळाचं खोबरं प्रसाद असतं, काहींसाठी त्यातलं पाणी औषधाप्रमाणं (Medecines) काम करतं. नारळाचे फायदे सांगावेत तितके कमी. 

महिला का नाही फोडत नारळ? (Woman and coconut beliefs)
हिंदू शास्त्रामध्ये नारळाला मानवी जीवनाचं प्रतीक मानलं जातं. हिंदू संस्कृतीत महिलांना सहसा नारळ फोडू दिला जात नाही. पौराणिक मान्यतांनुसार नारळ हे एक 'बी' (Seed) आहे आणि स्त्री तिच्या गर्भातील बाळाला तसंच मोठं करते. त्यामुळं त्यांना नारळ फोडण्यास दिला जात नाही आणि जर महिलेनं नारळ फोडला तर तिला संतानप्राप्तीमध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं. (Coconut for auspicious blessings good health of childrens kno details)

नारळ आणि संतानप्राप्तीचा संबंध काय? 
नारळ फोडताना त्यातून पाणी बेहर पडतं आणि त्यात एक पांढऱ्या रंगाचं बी असतं. जे गर्भाचं प्रतीक समजलं जातं. असं म्हणतात की, ज्या महिलेला गर्भधारणेमध्ये अडचणी येतात तिनं नारळातील हे बी खावं. तिची मनोकामना पूर्ण होते. 

अधिक वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

नारळ फोडल्यानंतर त्यात बी आढळल्यास ते चावून खाण्याऐवजी पाण्यानं थेट गिळलं जाईल ही बाब लक्षात ठेवा. सोबतच ते ग्रहण करताना कोणीही टोकणार नाही, अडवणार नाही याची काळजी घ्या. 

नारळ कसा फोडावा? (How to break Coconut? )

असं म्हणतात की, नारळ वर्तुळाकार फुटणं अतिशय चांगलं असतं. तुम्ही नारळ फोडताना तो वाकडातिकडा फुटतो का? त्यासाठी एक शक्कल लढवली जाऊ शकते. नारळ फोडण्याआधी त्यावर पाणी मारा, हातानं अंदाजे त्याच्या मध्यभागातून अंगठ्याच्या आधारे एक वर्तुळ तयार करा. 

हे वर्तुळ आखल्यानंतर नारळ फोडा, तो 90 टक्के तुम्हाला अपेक्षित आकारात फुटेल. नारळाचं खोबरं त्याच्या वाटीपासून अगदी सोप्या पद्धतीनं वेगळं करायचं असल्यास त्याच्या कवडी एका पाण्यानं भरलेल्या पातेल्यात ठेवा. नंतर हे पातेलं गॅसवर ठेवून मध्यम आचेवर पाणी गरम होऊ द्या. 10 मिनिटांनी गॅस बंद करा. पाणी काहीसं थंड झाल्यानंतर नारळाची कवड काढा आणि बटर नाईफ किंवा चमचा वापरून खोबरं सहजपणे वेगळं करा. 

(वर देण्यात आलेल्या माहितीची झी 24 तास खातरजमा करत नाही)