राशीभविष्य २२ फेब्रुवारी : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज विचार करुनच निर्णय घ्या

कसा आहे तुमचा आजचा दिवस?

Updated: Feb 22, 2020, 08:22 AM IST
राशीभविष्य २२ फेब्रुवारी : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज विचार करुनच निर्णय घ्या

मेष - काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करु शकता. विचार करुनच निर्णय घ्या. घाई-गडबडीत नुकसान होऊ शकतं. तब्येतीची काळजी घ्या. वाहन खरेदीचा विचार करु शकता. वैवाहिक जीवन सुखी राहील. पैशांच्या बाबतीत, गुंतवणूकीबाबत योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.

वृषभ - व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गातील व्यक्तींना बढतीची शक्यता आहे. जोडीदाराची मदत मिळेल. अविवाहितांच्या प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. कामाचा व्याप कमी होऊ शकतो. करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन - नशीबाची साथ मिळेल. सक्रीय राहाल. ऑफिसमध्ये नवीन काम किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन लोक जोडले जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. भावनिक सहयोग मिळेल. सामाजिक किंवा सामूहिक कामांसाठी लोकांशी भेट होऊ शकते. उत्साही राहाल. तब्येतीत सुधारणा होईल.

कर्क - ऑफिसमध्ये लोकांना प्रभावित करु शकता. नोकरी बदलण्याचा विचार करु शकता. नशीबाची साथ मिळेल. नवीन सुरुवात करण्यात यशस्वी व्हाल. अचानक फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. सांभाळून राहा.

सिंह - अधिकाऱ्यांकडून सहकार्य कमी मिळेल. व्यवसायात सावध राहा. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करु नका. एकटेपणापासून दूर राहा. पैसे विचार करुन खर्च करा. जोडीदारासोबत प्रवास होऊ शकतो. 

कन्या - पैशांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. कोणालाही सल्ला देऊ नका. तब्येत चागंली राहील.

तुळ - राहिलेली कामं पूर्ण होतील. काही लोक तुमच्या कामाचा विरोध करु शकतात. नोकरी, व्यवसायात वेळेवर मदत न मिळाल्याने समस्या येऊ शकतात. काही नवीन करण्याचा विचार करु शकता. येणाऱ्या दिवसांत मोठया योजना आखू शकता. जोडीदाराची मदत मिळेल. 

वृश्चिक - व्यवसायात फायद्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. समस्या कमी होतील. जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल. व्यवसायात विचार करुन निर्णय घ्या. तब्येतीची काळजी घ्या.

धनु - वायफळ कामात वेळ वाया जाऊ शकतो. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. 

मकर - दिवस अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात नवीन कल्पना येऊ शकतात. उत्साही राहाल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. जोडीदाराशी मदभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ - करियरसाठी दिवस चांगला आहे. ऑफिसमधील व्यक्तींची मदत होऊ शकते. चांगले बदल होऊ शकतात. धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. 

मीन - अचानक फायदा होऊ शकतो. धनलाभ होऊ शकतो. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन जबाबदारी मिळू शकते. बोलताना विचार करुन बोला.