मेष - नवीन कामाची सुरुवात करु शकता. विचार करत असलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. आजचा दिवस कुटुंब, खाजगी गोष्टी आणि पैशांच्या गोष्टीमध्ये जाईल. मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. जबाबदारीकडे लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा.
वृषभ - आज कोणताही निर्णय घेऊ नका. चिडचिड होऊ शकते. सावध राहा. विचार करुन बोला. जोडीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. दिवस सामान्य आहे.
मिथुन - नवीन काम मिळू शकतं. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन ऑफर मिळू शकतात. विचार करत असलेली कामं सुरु करा. समस्या लवकर संपतील.
कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही कामात गैरजबाबदारपणा करु नका. अधिक मेहनत घ्या लागेल. दिवस चांगला आहे. आनंदी राहाल.
सिंह - विचार करत असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. अनेक विचार मनात येतील. पैशांच्या बाबतीत सावध राहा. गुंतवणूक किंवा पैसे इतरांना देताना विचार करुन पुढे जा. कटू बोलू नका. आज कोणतीही योजना आखू नका.
कन्या - व्यवसायात नवीन काम सुरु होऊ शकतं. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. विचाराधीन असलेली कामं पूर्ण होतील. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. धैर्य ठेवा. तब्येत चांगली राहील. मन प्रसन्न राहील.
तुळ - दिवस चांगला आहे. कामात मन लागेल. अचानक काही नवीन गोष्टी, चांगल्या संधी समोर येऊ शकतात. त्याचा फायदा करुन घ्या. मनात अचानक काही विचार येऊ शकतात जे फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबत संबंधांमध्ये अनुकूलता राहील. उत्साही राहाल.
वृश्चिक - नोकरी, व्यवसायात अचानक काही निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसानीची शक्यता आहे. निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. वायफळ खर्च होऊ शकतो. कोणतीही समस्या असल्यास त्यावर पूर्ण विचार करुन निर्णय घ्या.
धनु - आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. गैरसमज, इतर समस्या समजूतीने सोडवा. धनलाभाची शक्यता आहे. नवीन ओळखी होऊ शकतात. नोकरी-व्यवसायातील अडथळे दूर होतील. तब्येतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.
मकर - मनात अनेक गोष्टींचा गोंधळ असेल. जुन्या गोष्टींमध्ये रमाल. कोणत्याही गोष्टींवर त्वरित उपाय मिळणार नाही. कामं अर्धवट राहू शकतात. कामात मन लागणार नाही. तब्येतीची काळजी घ्या. गोंधळाची परिस्थिती असल्यास विचार करुन निर्णय घ्या.
कुंभ - पुढील कामाच्या योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. बढतीची शक्यता आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. दिवस चांगला आहे.
मीन - व्यवसायात काही नवीन करण्याच्या स्थितीत समस्या वाढू शकतात. नोकरी, व्यवसायात घाई करु नका. कोणत्याही कामाचा रिझल्ट न आल्यास टेन्शन घेऊ नका. धैर्य ठेवा. गोष्टी सुरुळित होतील. दिवस आनंदात जाईल.