close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | २ मे २०१९

कसा असेल आजचा दिवस? 

Updated: May 2, 2019, 08:55 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार |  २ मे २०१९

मेष - आर्थिक व्यवहार विचारपूर्वकपणे करा. साथीदाराचा सल्ला घ्या, फायद्याचं ठरेल. अर्थार्जनाच्या योजना आखाल. नोकरीच्या बाबतीत काही चांगले प्रस्ताव मिळतील. चांगल्या मित्रांशी भेट घडेल. कामाच्या ठिकाणी इतरांची साथ मिळेल. तुमचे सल्ले कोणासाठीतरी फायद्याचे ठरतील. 

वृषभ - चांगल्या योजनांचा तुम्हाला फायदा होईल. विचारात असणारी कामं पूर्णत्वास जातील. नोकरी किंवा दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. नव्या वस्तूंची खरेदी फायद्याची ठरेल. तुमच्या योजनांच्या बळावर इतरांना प्रभावित कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मिथुन- आज नवे प्रयोग कराल. आत्मविश्वास वाढलेला असेल. मनाचं ऐका. प्रत्येक नातेसंबंधांमध्ये सहजता असेल. इतरांशी तुमचा सुरेख ताळमेळ राहील. कुटुंबासमवेत बाहेर फिरण्यासाठी जाण्याचा य़ोग आहे. 

कर्क - प्रयत्न केल्याच यश मिळेल. आज तुम्ही जवळपास तुमच्या म्हणण्याने कोणाचाही होकार मिळवू शकता. कुटुंबातील काही प्रकरणं अचानक तुमच्यसमोर येतील. स्वत:साठी थोडा वेळ काढा. कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या क्षेत्रात तडजोड करावी लागू शकते. पण, येत्या दिवसांमध्ये याच गोष्टी तुमच्या पक्षात असतील. 

सिंह - आजच्या दिवशी कामं पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब कराल. व्यग्र असूनही दिवस चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल. पैशाच्या बाबतीत फायदा होईल. नवी नोकरी मिळेल. इतरांचा तुमच्याप्रती असणारा दृष्टीकोन सकारात्मक असेल. पदोन्नती आणि आदर मिळेल. 

कन्या - नोकरीच्या ठिकाणी काही नव्या कामांमध्ये यशस्वी व्हाल. करिअरशी निगडीत गुंतागुंत सुरळीत होईल. त्रास करुन घेऊ नका. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. बढतीही मिळेल. नवे मित्र भेटतील. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. 

तुळ - स्वत:वर विश्वास ठेवा, मेहनत करा. माहिती मिळवा. इतरांना भेटा, गरज पडल्यास प्रवासही करा. तुमच्या आयुष्यातील अनेक पैलू बदलणार आहेत. जुन्या गोष्टी आणि आठवणी विसरण्याचा प्रयत्न करा. राहणीमानातही बदल करण्याची इच्छा होईल. 

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नवी कामं सुरु करण्याच्या दिशेने काही पावलं उचलाल. इतरांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. सकारात्मक राहा. आज अशा काही व्यक्तींची भेट घडू शकते, ज्यांचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम असेल. आर्थिक व्यवहार पूर्ण करा. 

धनु - जास्तीत जास्त अडचणी दूर करण्यात यशस्वी ठराल. मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होईल. गुंतवणूक करण्याच्या बाबतीत काहींची भेट घ्या, चर्चा करा. संधी गमावू नका. दिवस कधी संपेल कळणारही नाही. काही नव्या आणि लक्षवेधी व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार कराल. 

मकर - धाडस आणि सातत्याने जितकी मेहनत केली होती, त्याचे परिणाम तुमच्या पारड्यात असतील. जुन्या मित्रांशी गप्पा किंवा भेट होण्याची शक्यता आहे. जबाबदारी पूर्ण होईल. नोकरी  आणि प्रवासाच्या बाबतीत आज तुमच्याकडे अनेक पर्याय असतील. सोबत असणाऱ्यांची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी काही नव्या गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल.  

कुंभ - काही महत्त्वाच्या बदलांना आजपासून सुरुवात होईल. गुढ गोष्टींकडे तुमचा कल जास्त असेल. चांगल्या वागणुकीमुळे तुम्हीच यशस्ली होणार नाहीत. पण, तुम्हाला भेटणारे इतर लोकही आनंदी होतील. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीप्रती आकर्षण वाटेल. साथीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. दृष्टीकोन कायम सकारात्मक ठेवा. 

मीन - चांगल्या संधी मिळतील. नवे बेत आणि संधीच्या बळावर मोठे निर्णय घ्याल. नोकरीच्या ठिकाणी नवं पद किंवा नवे प्रस्ताव मिळतील. मोठ्या अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. प्रवासयोग आहे.