Horoscope Today 1 February 2023, Daily Horoscope : आज देशासाठी महत्त्वाचा दिवस आहे. भारताचं आर्थिक वर्ष 2023-24 चं बजेट मांडलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे बजेट सादर करणार आहेत. दुसरीकडे प्रत्येक दिवस हा वेगवेगळे आव्हान घेऊन येतो. काहीसाठी तो आनंदायी असेल तर काही लोकांसाठी तो त्रासदायक ठरतो. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा कसा असेल, ते जाणून घेऊयात...कारण आजच्या दिवशी काही राशींच्या लोकांनी चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 1 february 2023 all zodiac signs color for zodiac signs today and remedy upay totke marathi news)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. नवीन गाडी घेण्याची योग्य आहेत. मात्र व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा.
उपाय - मुलींना खीर खायला द्या आणि हनुमानजींना लाल फुले अर्पण करा.
शुभ रंग - नारिंगी
आजच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्यांना आर्थिक लाभ होमार आहे. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
उपाय - मुलीला पांढरे खेळणे दान करा.
शुभ रंग - पांढरा
आजच्या दिवशी या राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आज तुमच्यावर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद राहिल. लग्नाच्या बाबातीत घाई करु नका.
उपाय - वडिलांचा आदर करा. देवीच्या मंदिरात चुनरी अर्पण करा.
शुभ रंग - हिरवा
आजच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी नोकरीत कोणताही बदल करू नका. शिवाय वाहन जपून चालवा. आजच्या दिवशी आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या.
उपाय - पार्वतीला गुलाब अर्पण करा.
शुभ रंग - गुलाबी
आजच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना संध्याकाळपर्यंत आनंदाची बातमी मिळणार आहे. मात्र तुमचे दागिने सुरक्षित ठेवा. कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यास, कर्जदार वसुलीसाठी दुकानात उभे राहू शकतात. मनात दुःख आणू नका.
उपाय - दुर्गादेवीला पिवळे फुले अर्पण करा.
शुभ रंग - पिवळा
आजच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी ऑफिसमध्ये कामात लक्ष द्या. बॉस आणि वरिष्ठांचे हावभाव आणि शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. वडिलोपार्जित मालमत्तेमुळे प्रियजनांपासून दुरावण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.
उपाय - लहान मुलींना मिठाई वाटप करा.
शुभ रंग - मारून
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे. तर मुलांकडे लक्ष द्या आणि मित्रांकडून आजच्या दिवशी काही लपवू नका.
उपाय - देवीच्या मंदिरात कमळाचे फूल अर्पण करावे.
शुभ रंग - गुलाबी
वृश्चिक राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे योग टळणार आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी तसेच कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
उपाय - गरजूंना दानधर्म करा.
शुभ रंग : लाल
आजच्या दिवशी पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. वागण्यात सौम्यता ठेवा, नाती जपण्याचे काम करा.
उपाय - लक्ष्मीच्या मंदिरात लाल फुलं आणि चुनरी अर्पण करा.
शुभ रंग -सोनेरी
या राशीच्या लोकांचे जुनाट आजारांपासून मुक्ती मिळेल. कार्यक्षेत्रातील कामाच्या संदर्भात लांबचे प्रवास करावे लागतील. मित्रांचा आदर करा. मात्र आजच्या दिवशी अजिबात गुंतवणूक करू नका.
उपाय - देवी मंदिरात फळे अर्पण करा.
शुभ रंग - निळा
तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि कामाच्या जोरावर सरकारी प्रशासनाकडून सन्मान आणि आर्थिक लाभ मिळेल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होईल. मात्र आजच्या दिवशी जोडीदाराची तब्येत खराब राहील. स्थावर मालमत्तेची समस्या संपेल.
उपाय - देवीच्या मंदिरात मेहंदी अर्पण करा.
शुभ रंग: गुलाबी
व्यापार्यांनी कोणताही सौदा करताना सावधगिरी बाळगावी कारण धनहानी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक परिस्थिती सामान्य असेल. घरातील वातावरणही चांगले राहील. वाहन जपून चालवा कारण दुखापत होण्याची शक्यता आहे.
उपाय - देवीच्या मंदिरात सीताफळ अर्पण करा.
शुभ रंग: पिवळा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)