Horoscope 14 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार टाळा. काही मोठी आणि आवश्यक ते बदल घडतील. अविवाहितांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी अनेक कामांत तुम्हाला वडिलांची साथ मिळेल. पगार वाढ यासारखी चांगली बातमी ऐकायला मिळेल.घरातील शुभ कार्यात अधिकचा खर्च होईल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी सुखसुविधांच्या गोष्टींवरचा खर्च वाढू शकतो. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. कामाचा ताण वाढू शकतो.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी एखाद्याच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवले, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी नव्या माणसांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या प्रकरणावर विचार होऊ शकतो. जर विचार सकारात्मक असतील कर कामाच्या पद्धतीत देखील बदल जाणवतील.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायत कोणी असा सल्ला देईल की वेळच बदलून जाईल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नका. कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोणाशीही वाद सुरू करू नका.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी अनेक प्रकरणे सहज सुटतील. सध्याच्या नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. काही खास नाती आणखी मजबूत होतील.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी नोकरदार वर्गाला नव्या आणि चांगल्या संधी मिळू शकतील. कार्यक्षेत्रात काही बदल होऊ शकतात.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होतील. कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे गोंधळून जाऊ शकता.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी प्रेमात मतभेद होऊ देऊ नका. पैशाच्या व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही विषयावर वादात पडू नका.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )