Horoscope 22 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुम्ही मांडलेलं मत योग्य आहे, हे इतरांना पटवून देण्यासाठी जीवनसाथीकडून मदत मिळेल. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी अचनाक धन लाभ होण्याची शक्याता आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी प्रेम प्रकरणामुळे मन आनंदी राहील. घरात कार्यक्रम असल्यामुळे अधिक खर्च होईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी सकारात्मक विचार कराल तर सर्व अडचणींवर मात करू शकाल. मानसिक आरोग्य राखण्यासाठी छंद जोपासा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. दिवस आव्हानात्मक असेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना जुन्या आजारांपासून आराम मिळेल. सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान केला जाईल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी भावनेच्या आहारी जाऊ नका. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी वेळेत आपलं काम कसं पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. कोणत्याही नव्या कामासाठी दिवस चांगला ठरणार आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी तुम्ही चांगल्या संधींचा सहज फायदा घ्याल. तुम्हाला पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी अधिका-यांशी वादापासून दूर राहिल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )