Horoscope 29 January 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना मालमत्ता खरेदी आणि धनलाभ होण्याचे योग, जाणून घ्या राशीभविष्य

Daily Rashi Bhavishya : येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो. नवीन दिवस नवीन काही तरी घेऊन येतं. आज रविवार 29 जानेवारी 2023, सुट्टीचा दिवस...तरीदेखील आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे, जाणून घ्या. 

Updated: Jan 29, 2023, 07:17 AM IST
Horoscope 29 January 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना मालमत्ता खरेदी आणि धनलाभ होण्याचे योग, जाणून घ्या राशीभविष्य
daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 29 january 2023 marathi news

Horoscope 29 January 2023 : नवीन पहाटे नवीन सुरुवात...असाच प्रत्येकाचा दिवस असावा. प्रत्येक दिवसाची ही सकारात्मक दृष्टीकोनातून केली पाहिजे. पण अनेकांच्या आयुष्यात अनेक संकट असता, कोणाला आर्थिक त्रासाचा सामना करावा लागतो. तर कोणाच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण असतं. पण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. त्यामुळे आजच्या दिवस तुमच्यासाठी कसा आहे. तुमचे तारे काय सांगतात, आज तुमच्या भविष्यात काय होणार आहे. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 29 january 2023 marathi news)

मेष (Aries)

आजचा दिवस या राशीच्या व्यक्तींना आरोग्याची समस्या उद्धभवू शकते. पण कुटुंबात कुठले वाद सुरु असतील तर ते संपुष्टात येतील. शिवाय आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी आज ओम मंत्राचा जप करा. 

शुभ रंग: गेरू

वृषभ (Taurus)

 आजच्या दिवस हा वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. त्यांना मालमत्ता खरेदीचा योग चालून आला आहे. मित्रांचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही तांदूळ दान करा. 

शुभ रंग: निळा

 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी कामाचा ताण कमी राहील. या राशीच्या लोकांना नोकरी बदलाचे योग आहेत. शिवाय आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी हिरव्या भाज्या दान करा.

शुभ रंग: हिरवा

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. जोडीदाराशी आज तुमचं मतभेद होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही गुळाचं दान करा. 

शुभ रंग: आकाशी निळा

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना नोकरीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय आज पैसा खर्च होऊ शकतो. आज या राशीच्या लोकांनी अन्नधान्य दान करावे. 

शुभ रंग: लाल

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांची लग्नाची समस्या संपेल, त्यांना योग्य जोडीदार मिळेल. मात्र आज आरोग्याची काळजी घ्या. याशिवाय तुमचे अडकलेले पैसे मिळतील. आज पिवळ्या मिठाईचं दान करा. 

शुभ रंग: निळा

तुला (Libra)

या राशीच्या लोकांचे आज जास्त पैसे खर्च होती. नवीन घरासाठी पैसा खर्च होईल. नोकरीत प्रगती होईल. तर कुटुंबात आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण असणार आहे. आजच्या दिवशी तुपाचे दान करावे.

शुभ रंग: तपकिरी

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांना आरोग्याचा त्रास असेल तर ते सुधारतील. वरिष्ठांकडून आज आनंदाची बातमी मिळेल. शिवाय तुम्हाला वरिष्ठांकडून लाभ होण्याचा योग्य आहे. जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील ते बुडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी लाल फळांचं दान करा.
शुभ रंग: तपकिरी

धनु (Sagittarius)

आजच्या दिवस या राशीच्या लोकांसाठी आळसाने भरलेला असेल. मुलांमुळे तुम्ही चिंतेत राहा. रविवार असल्याने आज तुमच्याकडे पाहुणे येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी भगवा तिलक लावावा. 

शुभ रंग: लाल

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी नोकरी मिळण्यात अडचणी येतील. शिवाय जोडीदाराशी असलेले मतभेद संपतील. आज तुम्हाला घरी जास्त वेळ घालवावा लागू शकतो. आजच्या दिवशी गुरु मंत्राचा जप करा.

शुभ रंग: आकाशी निळा

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी परदेश प्रवासाचे योग येणार आहे. याशिवाय थांबलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे. मात्र आजच्या दिवशी व्यवसायात पैसे गुंतवू नका. आज तुम्ही अन्नदान करा.
शुभ रंग: राखाडी

मीन (Pisces)

आजच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. शिवाय नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. मात्र आजच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज तुम्ही गुळाचं दान करा. 
शुभ रंग: गाजर