Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजन कसे करावे ? लक्ष्मीपूजन विधी आणि अशी करा मांडणी, पाहा Video

Diwali 2022 :   आज संध्याकाळी अख्खा देश प्रकाशमय होईल. लक्ष्मीपूजन कसे करावे, पूजेसाठी काय साहित्य लागतं. शिवाय मांडणी कशी करायची...आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल  आज आपण जाणून घेणार आहोत. 

Updated: Oct 24, 2022, 07:21 AM IST
Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजन कसे करावे ?  लक्ष्मीपूजन विधी आणि अशी करा मांडणी, पाहा Video title=
Diwali 2022 Lakshmi Ganesh Puja Muhurat Sahitya ritual 2022 video nmp

Lakshmi Ganesh Puja Muhurat 2022 : आली माझ्या घरी ही दिवाळी. यंदा छोटी दिवाळी आणि दिवाळी (Diwali 2022 ) एकाच दिवशी आली आहे. पहाटे उठून अभ्यंगस्नान करुन अनेकांनी फराळावर ताव मारला आहे. आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल. देशभरात मोठ्या उत्साहात प्रकाशाचा सण साजरा करण्यात येईल. आज संध्याकाळी अख्खा देश प्रकाशमय होईल. लक्ष्मीपूजन कसे करावे, पूजेसाठी काय साहित्य लागतं. शिवाय मांडणी कशी करायची...आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल  आज आपण जाणून घेणार आहोत. 

लक्ष्मीपूजन 2022 (Laxmi Pujan 2022)

दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण...आजच्या दिवशी घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी घरोघरी नांदो अशी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी आणि गणरायाची आज पूजा केली जाते. नवीन कपडे परिधान करुन प्रकाशाचा हा सण साजरा केला जातो. लहान मुलांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह दिसून येतो. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला साधी सोपी लक्ष्मीपूजनाची मांडणी आणि पूजा विधी सांगणार आहोत. (Diwali 2022 Lakshmi Ganesh Puja Muhurat Sahitya ritual 2022 video nmp)

लक्ष्मीपूजन 2022 शुभ मुहूर्त (Laxmi Pujan Shubh Muhurat)

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा आज 24 ऑक्टोबर 2022 ला संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 पर्यंत आहे.

लक्ष्मीपूजन 2022 साहित्य (Lakshmi Pujan Sahitya) 

लक्ष्मीपूजन(Lakshmi Pujan 2022) करिता काय साहित्य लागतं याविषयी आपण जाणून घेऊयात 

लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा. 
चौरंग किंवा पाठ 
लाल रंगाचे कापड 
पाणी
तांदूळ 
गंध 
पंचामृत
हळद, कुंकू 
अक्षदा 
फुले 
विड्याची पाच पाने 
झाडू
लाह्या बताशे

लक्ष्मी पूजन का केलं जातं ? (Lakshmi Pujan story)

प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा आहे. लक्ष्मीपूजनाबाबत पण एक प्रसिद्ध कथा आहे. असं म्हणतात विष्णू देवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व देवांना माता लक्ष्मीसह बळीच्या कारागृहातून मुक्त केलं होतं. माता लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी, त्यामुळे आपण आजच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि विजयाचा आनंद साजरा करतो. 

लक्ष्मीपूजन विधी (Lakshmi Pujan ritual)

लक्ष्मीपूजन विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी.  त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते.