Laxmi Puja: लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचा प्रसाद का असतो? जाणून घ्या यामागचं कारण

 दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. या दीपोत्सव पर्वात देवी लक्ष्मी, कुबेर, गणपती आणि सरस्वतीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी राहावी यासाठी कार्तिक अमावास्येच्या रात्री लक्ष्मी पूजन केलं जातं. यावर्षी लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबरला आहे. लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचं विशेष महत्त्व आहे. 

Updated: Oct 18, 2022, 04:45 PM IST
Laxmi Puja: लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचा प्रसाद का असतो? जाणून घ्या यामागचं कारण title=

Diwali 2022 Laxmi Pujan Lahya Batasha Prasad: दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. या दीपोत्सव पर्वात देवी लक्ष्मी, कुबेर, गणपती आणि सरस्वतीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी राहावी यासाठी कार्तिक अमावास्येच्या रात्री लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) केलं जातं. यावर्षी लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबरला आहे. लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचं विशेष महत्त्व आहे. लाह्या-बताशांच्या नैवेद्याशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण राहते. याशिवाय पूजेच्या वस्तूंमध्ये केशर, रोळी, तांदूळ, सुपारी, सुपारी, फळे, फूल, दूध, केक, बताशे, सिंदूर, सुका मेवा, मिठाई, दही, गंगाजल, अगरबत्ती, दिवा, नारळ आणि कलश यांचा वापर केला जाते. या दिवशी देवी लक्ष्मीचे चित्र असलेलं सोनं किंवा चांदीचं नाणं खरेदी करून पूजा केली जाते.

लक्ष्मी पूजनात लाह्या आणि बताशा का असतो?

लाह्या हा भाताचा एक प्रकार आहे. लाह्या तांदळापासून बनवल्या जातात. तांदूळ भारतातील मुख्य अन्न आहे. दिवाळी म्हणजे भाताचे पहिले पीक येण्याची वेळ असते. त्यामुळे देवी लक्ष्मीला पहिले पीक अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि घर धनधान्याने भरते. याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार शुभ्र आणि गोड बताशा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.  धन आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. अशा स्थितीत शुक्र ग्रह आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी पूजेत मुख्यतः लाह्या आणि बताशे अर्पण केले जातात. 

Diwali Bhaubeej 2022: भाऊबीज सण कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

दिवाळी 2022- 24 ऑक्टोबर

  • लक्ष्मी-गणेश पूजनाची शुभ वेळ - संध्याकाळी 06:54 ते 08:16 मिनिटे
  • लक्ष्मी पूजनाचा कालावधी - 1 तास 21 मिनिटे
  • प्रदोष काल - संध्याकाळी 05:42 ते 08: 16 संध्याकाळी,
  • वृषभ कालावधी - संध्याकाळी 06 वाजता 54 मिनिटे ते रात्री 08:50