Nirjala Ekadashi 2023: निर्जला एकादशीचे व्रत यंदा ३१ मे २०२३ (nirjala ekadashi muhurat) रोजी करता येणार आहे. निर्जला एकादशीला भगवान विष्णुंची मनोभावे पुजा केली जाते. वर्षात येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये निर्जला एकदशी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असते व अधिक फलदायी असते. म्हणूनचे हे व्रत कठिण असते, असं मानलं जातं. त्यामुळं निर्जला एकादशीच्या मुहूर्तावर कोणत्या गोष्टी दान कराव्यात याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत. या गोष्टी दान केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, शांति निर्माण होईल त्याप्रमाणेच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. (nirjala ekadashi 2023 date)
नवातच निर्जला एकादशीचे महत्त्व सांगितले आहे. निर्जला म्हणजेच पाणीही न पिता या एकादशीचे व्रत करावे, असं सांगितले जाते. निर्जला एकादशीचे व्रत केल्यास सर्व एकादशी व्रताचे पुण्याफळ मिळते, अशीही मान्यता आहे.
हिंदू पंचागानुसार, एकादशी तिथी ३० मे रोजी दुपारी १ वाजून ०७ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ३१ मे रोजी दुपारी ०१ वाजून ४५ मिनिटांनी संपणारआहे.
- निर्जला एकादशीच्या निमित्ताने मिठाचे दान केल्यास घरात कधीच द्रारिद्र्य येणार नाही, तसंच, काळ्या तिळाचे दान केल्यास असाध्य रोगांपासून मुक्ती मिळेल.
- या दिवशी काळ्या रंगाच्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्यास आयुष्य वाढते. असे सांगितले जाते. धान्याचे दान केल्यासही घरात सुबत्ता येते. अशा लोकांवर सदैव भगवान विष्णु यांचा आशीर्वाद राहतो.
- फळे दान करणे देखील शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत खूप फलदायी असते. त्यामुळं व्रताचा उपवास करताना तुम्हीदेखील या वस्तु दान करु शकतात.
- निर्जला एकदशीदिवशी धान्य दान केल्यास घरात कशाचीच कमी पडणार नाही. भगवान विष्णुंची तुमच्यावर कृपादृष्टी राहिल.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुच्या मंत्राचा जाप करत विधीनुसार पुजा करावी. या दिवशी महिला अखंड सौभाग्याची कामना करण्यासाठी पाण्याने भरलेला मडके दान करु शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, निर्जला एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसंच, या व्रतामुळं मोक्ष मिळतो, असंही सांगितलं जातं.
दरम्यान, या दिवसांत उष्णतेची तीव्रता अधिक असते अशा वेळी आपल्या शरिराला पाण्याची गरज अधिक असते. त्यामुळं ज्यांना शक्य असेल त्यांनीच हे व्रत करावे. आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच हे व्रत करावे.