Rahu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक खास महत्त्व देण्यात येतं. मात्र यामध्ये राहू आणि केतू यांना मायावी ग्रह मानलं जातं. या दोन्ही या ग्रहांचं भौतिक अस्तित्व नाही आणि ते सूर्य आणि चंद्राच्या परिभ्रमण मार्गांचे छेदनबिंदू आहेत.
ज्योतिषशास्त्राबरोबरच त्यांचा आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनही खूप महत्त्वाचा आहे. शनीच्या नंतर राहु हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. हे एका राशीत सुमारे अठरा महिने राहतात. आगामी महिन्यात म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:13 वाजता राहु मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. राहूच्या गोचरचा लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
राहु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात प्रवेश करेल जे तुमच्यासाठी खूप शुभ परिणाम देईल. वृषभ राशीच्या लोकांना संपत्ती वाढ आणि व्यवसायात अचानक नफा मिळेल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. पूर्वीच्या योजनांमध्ये यश मिळेल आणि मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ येईल. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
या राशीसाठी राहू दहाव्या घरात प्रवेश करणार आङे. या काळात कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. तुम्हाला अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. मीडिया आणि आयटी क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहणार आहे. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा असेल.
या राशीच्या लोकांसाठी राहू सहाव्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते किंवा परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळणार आहे. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)