Rahu Ketu Gajkesari Yog : प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदल असतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ग्रह गोचर किंवा ग्रह परिवर्तन असं म्हणतात. या ग्रहांच्या गोचरमुळे कुंडलीत अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ असे योग तयार होत असतात. गुरु ग्रह मेष राशीत असून चंद्राच्या स्थिती बदलामुळे अत्यंत असा शुभ गजकेसरी योग तयार होत आहे. 17 सप्टेंबरला चंद्र रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी तूळ प्रवेश करणार आहे. कुंडलीतील गुरु आणि चंद्रातीची ही स्थिती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पण आधीपासून मेष राशीत राहू आणि तूळ राशीत केतू विराजमान आहेत. अशात गजकेसरी या शुभ योगावर केतू आणि राहुची करडी नजर असणार आहे. त्यामुळे तीन राशींसाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. (gajkesari yoga guru chandra Guru Chandal Yog rahu ketu these 3 zodiac signs crisis)
धनु राशीच्या लोकांच्या कुंडलीत गजकेसरी योग पाचव्या आणि अकराव्या घरात तयार होतो आहे. पण राहुकेतुमुळे या राशींच्या लोकांना गजकेसरी योगाचा लाभ होणार नाही. त्यांची सर्व काम बिघडणार आहे. होणारी कामं होणार नाही, लव्ह लाइफमध्ये वादविवाद आणि अडचणी येतील. कुटुंबातून विरोध सहन करावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात नुकसान होणार आहे.
तूळ राशीच्या कुंडलीत चंद्र आणि केतुच्या युतीतून ग्रहण योग तयार होतो आहे. त्यात राहुची करडी नजर तुमच्यावर असणार आहे. अशात तुमच्या आयुष्यात अचडणींचा डोंगर उभा राहणार आहे. जोडीदारासोबत वादविवाद होणार आहे. अनेक संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. कोर्टकचेरीच्या पायरा तुम्हाला चढाव्या लागणार आहे. आरोग्याचीही तक्रार तुम्हाला सहन करावी लागणार आहे. अनावश्यक पैसा खर्च होणार आहे.
मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरु आणि राहु एकत्र असणार आहे. त्यामुळे मेष राशीत चांडाळ योग निर्माण होणार असून तो 30 ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यामुळे या राशींच्या लोकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. घरातील ज्येष्ट नागरिकांच्या प्रकृती बिघडणार आहे. आयुष्यात अनपेक्षित घटना घडणार आहे. वैवाहिक जीवनात अशांतता असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)