Ganesh Jayanti 2023 Upay: विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या जयंतीला करा हे ज्योतिषीय उपाय, अडचणींवर सहज मिळेल मात

Ganesh Jayanti 2023: वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ| निर्विघ्न कुरुंमेदव सर्वकार्य सुसर्वदा| या मंत्रातून गणपती बाप्पाचं महत्त्व अधोरेखित होतं. गणपतीला विघ्नहर्ता म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच संकटाच्या काळात मदतीला धावून येणारा देवता..अशा या लाडक्या गणपती बाप्पांची पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला जयंती येते.

Updated: Jan 24, 2023, 12:38 PM IST
Ganesh Jayanti 2023 Upay: विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या जयंतीला करा हे ज्योतिषीय उपाय, अडचणींवर सहज मिळेल मात title=

Ganesh Jayanti 2023: वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ| निर्विघ्न कुरुंमेदव सर्वकार्य सुसर्वदा| या मंत्रातून गणपती बाप्पाचं महत्त्व अधोरेखित होतं. गणपतीला विघ्नहर्ता म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच संकटाच्या काळात मदतीला धावून येणारा देवता..अशा या लाडक्या गणपती बाप्पांची पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला जयंती येते. या दिवशी गणपती बाप्पा प्रकट झाले होते, त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. पंचांगानुसार गणेश जयंती 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजून 22 मिनिटांपासून 25 जानेवारी 2023 रोजी बुधवारी दुपारी 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. मात्र उदय तिथीनुसार गणेश जयंती 25 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाईल. गणेश जयंती यंदा बुधवारी आल्याने काही खास योग जुळून आले आहेत. गणपती बुद्धीची देवता आहे आणि बुधवार हा ग्रहांचा राजकुमार बुधाचा वार आहे. बुध ग्रह हा देखील बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरतील. चला जाणून घेऊयात गणेश जयंतीनिमित्त काही ज्योतिषीय उपाय

गणेश जयंतीला करा हे उपाय

  • गणेश जयंतीला सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर गणेश चालीसेचं पठण करून आरती करावी. गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्षाचं म्हणावं. यामुळे गणपतीची कृपा तुमच्यावर राहील.
  • गणेश जयंती बुधवारी आल्याने या दिवशी हिरव्या वस्तूंच दान करावं. याशिवाय गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र इत्यादींचं दान केल्यास चांगलं फळ मिळेल. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम मार्गस्थ लागतील. या उपयांमुळे कुंडलीतील बुध ग्रहाची स्थितीत सुधारणा होईल आणि बुध दोषातून शांती मिळेल.
  • गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी दान करावी. यामुळे शुभ परिणाम दिसून येतील.
  • गणेश जयंतीला पक्ष्यांना मुगाची डाळ खाण्यासाठी ठेवावी. यामुळे गणपती बाप्पांची कृपा मिळते.

बातमी वाचा- Mangal Asta: 100 हून अधिक दिवस मंगळ ग्रह जाणार अस्ताला, या तीन राशींसाठी हा काळ धोक्याचा

  • गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे. बुधवार आणि गणेश जयंतीचं औचित्य साधून 11 किंवा 21 जोडी दुर्वा अर्पण करावा. यामुळे जीवनातील अडचणी कमी होतील.
  • गणपती बाप्पांना या दिवशी हळदीही अर्पित करू शकता. हळदी वाहिल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. तसेच सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)