Govardhan 2022 : गोवर्धन पर्वताची (govardhan parvat) पूजा का केली जाते, या मागची कथा प्रत्येकाला माहिती आहे. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धनाची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यंदावर्षी दिवाळाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा होणार नाही. कारण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण असल्याने 25 ऑक्टोबरला गोवर्धन पूजा केली जाणार नाही. यंदा 27 वर्षांनंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजन होणार नसल्याची घटना घडत आहे. (govardhan puja status)
ग्रहणामुळे गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबरला होणार आहे. म्हणजेच दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा साजरी केली जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार ही परिस्थिती पूर्ण 27 वर्षांनंतर निर्माण होत आहे. यापूर्वी 1995 मध्ये दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण होतं.
गोवर्धन पूजा 2022 तिथी (govardhan puja special)
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. मात्र यावेळी 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्याने 25 ऑक्टोबरला गोवर्धन साजरी होणार नाही.
या वेळी प्रतिपदा तिथी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:18 वाजता सुरू होणार आहे आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.42 पर्यंत आहे. म्हणून 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.29 ते 8.43 पर्यंत गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)