Gudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा

Gudi padwa 2024 :  या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 26, 2024, 11:43 AM IST
Gudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा title=
Gudi padwa 2024 From Gudi padwa these zodiac sign will become rich After 30 years 3 auspicious Raja Yoga will shower the grace of Lord Shani

Gudi padwa 2024 : :  साडे तीन मुहूर्तांपैकी एक असा गुढी पाडव्या सण मराठी नववर्षांची सुरुवात होते. हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष असतो. यादिवशी श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. हिंदू पंचांगानुसार चैत्र हा कालनिर्णयानुसार पहिला महिना. गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा गुढीपाडवा हा 9 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्या ग्रहांचा अद्भूत मेळावा पाहिला मिळणार आहे. यंदा गुढीपाडव्याला शश राजयोग, अमृत सिध्दी योग आणि सर्वार्थ सिध्दी योग असणार आहे. या शुभ राजयोगामुळे काही राशीच्या लोकांवर मंगळ आणि शनिदेवाची कृपा बरसणार आहे. (Gudi padwa 2024 From Gudi padwa these zodiac sign will become rich After 30 years 3 auspicious Raja Yoga will shower the grace of Lord Shani)

वृषभ रास (Taurus Zodiac) 

गुढीपाडव्याला तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चांगल्या संधी देणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळणार आहे. या काळात आयुष्यातील अनेक संकटं दूर होणार आहेत. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

गुढीपाडव्या हा मिथुन राशीच्या लोकांना अच्छे दिन घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळणार आहे. राजयोगामुळे काही अडचणी दूर होणार आहे. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरी करणार्‍यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

धनु राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा लाभदायक ठरणार आहे. या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होणार आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश लाभणार आहे. घरातील लोक आनंदी असणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)