Jupiter And Sun Ki Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये बदलत्या राशीचा प्रभाव देशात दिसून येतो. यावेळी गुरु ग्रह सुमारे एका वर्षात आपली राशी बदलतो, ज्यामुळे त्याला त्याच राशीत परत येण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात. यावेळी गुरु वृषभ राशीमध्ये स्थित असून या राशीमध्ये कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा संयोग होत असतो. ग्रहांच्या संयोगाने राजयोग तयार होतात.
येत्या काळात ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या गुरु आदित्य नावाचा राजयोग गुरु आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार होणार आहे. गुरू वृषभ राशीत स्थित असून 14 मे रोजी संध्याकाळी 6:04 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. काही राशींच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूया.
या राशीच्या दुसऱ्या घरात गुरु आदित्य योग तयार होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळेल. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. समाजात मान-सन्मान मिळेल.
या राशीच्या दहाव्या घरात गुरु आदित्य योग तयार होणार आहे. भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही नवीन करिअर सुरू करू शकता. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातही वाढ आणि विस्तार होण्याची शक्यता आहे. वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
या राशीमध्ये तृतीय घरात गुरु आदित्य योग तयार होणार आहे. गुरु आणि सूर्याच्या आशीर्वादाने जीवनात आनंदच येईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळेल. चांगल्या कामात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )