Diwali च्या दिवशी दिसेल तिथून घरी आणा हे फुल; असंख्य गोष्टी एखाद्या चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील

Vastu Tips तुम्हीआम्ही सगळेच वाचतो, त्या अंमलात आणण्याचाही प्रयत्न करतो. पण, बऱ्याचदा काही मोठ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या घाईत लहानसहान गोष्टी आपण विसरुन जातो. हे फुल आणि त्याच्या फायद्यांविषयीसुद्धा असंच घडतं...

Updated: Oct 12, 2022, 01:02 PM IST
Diwali च्या दिवशी दिसेल तिथून घरी आणा हे फुल; असंख्य गोष्टी एखाद्या चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील title=
Diwali 2022 Money Vastu Tips and Aprajita Flower benefits

Diwali 2022 : दीपावलीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी (Devi laxmi) आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बहुविध उपाय केले जातात. असं म्हणतात की, दिवाळीच्या दिवशी काही सोपे उपायही मोठे फायद्याचे आणि दूरगामी परिणाम करणारे ठरतात. ज्योतिषशास्त्रात या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त आहे. अशाच काही लाभदायी उपायांपैकी एक म्हणजे अपराजिताचं फुल (Aprajita Flower). दिवाळीच्या दिवशी अपराजिताचं फुल घरात आणण्यामुळ पैशांची अजिबातच चणचण भासत नाही.

देवीला प्रसन्न करण्यासाठी फुलाचा वापर

दिवाळीच्या (Diwali)च्या दिवशी लक्ष्मी देवीला अपराजिता फूल वाहिलं जातं. असं केल्यास देवीचा वरहस्त कायम आपल्यावर असतो असं सांगतात. अनेक मान्यतांनुसार हे फुल आणि हे रोप देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्यामुळे ते अर्पण केल्यास त्यापासून होणारे परिणाम तुमचं आयुष्य पालटून टाकतात.

अधिक वाचा : Ganesh Puja: सकाळी अशा प्रकारे करा गणपतीची पूजा, क्षणात दूर होतील सर्व संकटे, व्यवसाय-करिअरमध्ये मोठी प्रगती

कशी कराल दिवाळीची पूजा? (Diwali laxmi pujan)

दिवाळीची पूजा करतेवेळी लक्ष्मीच्या चरणी अपराजिताची तीन फुलं वाहा. दुसऱ्या दिवशी ही फुलं एका लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा. असं केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, वायफळ खर्चांना आळा बसतो. अपरिताच्या फुलांना एका वर्षासाठी तिजोरीमध्ये ठेवा आणि पुढच्या वर्षी दिवाळीला परत हाच उपाय करा. तिजोरीशिवाय पैशांच्या बटव्यामध्येही तुम्ही ही फुलं ठेवू शकता. त्यासाठी कापडाऐवजी लाल रंगाच्या कागदाचा वापर करा. असं केल्यास कधीच तुम्हाला पैशांची कमतरता जाणावणार नाही.

वायफळ खर्च थांवण्यासाठी काय कराल?

अनेकांचीच ही तक्रार असते, की पगार चांगला असला तरीही पैसे (Money problems) हातात थरत नाहीत. या तक्रारीला दूर लोटण्यासाठी दिवाळीच्या दिवशी अपराजिताची 5 फुलं लक्ष्मीला अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ती नदीमध्ये प्रवाहित करा. तुमच्या वायफळ खर्चांना नक्कीच आळा बसेल.

अधिक वाचा : Lucky Sign: तळहातावरील 'ही' सात चिन्ह उघडतात नशिबाचं दार! जाणून घ्या

फक्त खर्च कमी करण्यासाठीच नव्हे, तर अपराजिताची पांढरी फुलं गणपतीला वाहिल्यास यामुळं चांगली नोकरीही मिळते अशी धारणा आहे. गणपतीला वाहिलेलं हे पांढरं फुल स्वत:कडे ठेवत ते नोकरीसाठी मुलाखतीला गेलं असतानाही सोबत बाळगा, तुम्हाला हवी तशीच नोकरी मिळेल असा अनेकांचा विश्वास आहे.

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)