Guru Pushya Yog: 28 जुलैला गुरुपुष्यामृत योग, 'या' वस्तूंचं दान करून पदरी पाडा पुण्य!

ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं.

Updated: Jul 27, 2022, 12:14 PM IST
Guru Pushya Yog: 28 जुलैला गुरुपुष्यामृत योग, 'या' वस्तूंचं दान करून पदरी पाडा पुण्य! title=

Guru Pushya Nakshatra 2022: ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं. हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूंसोबत बृहस्पती देवाची पूजा केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणून शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव असतो. 

गुरुपुष्यामृत योग 28 जुलैला म्हणजेच उद्या येत आहे. हा योग शुभ मानला जातो आणि या दिवशी शुभं कामं केली जातात. या योगावर दागिने खरेदी, गृह निर्माण कार्य सुरु केलं जातं. हिंदू पंचांगानुसार गुरुपुष्यामृतयोग 28 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल. 

ज्योतिषशास्त्रात या दिवशी दान केल्यास विशेष लाभ मिळतो, असं सांगितलं गेलं आहे. या दिवशी काही वस्तूंचं दान केलं तर पदरी पुण्य पडतं असं बोललं जातं.  या दिवशी तांदूळ, बूंदीचे लाडू, खिचडी, डाळ इत्यादींचं दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी गुंतवणूक करणं देखील शुभ मानलं जातं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)