राशीभविष्य : आज 'या' राशींच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Aug 3, 2020, 07:41 AM IST
राशीभविष्य : आज 'या' राशींच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला

मेष - कोमकाजासोबतच नव्या जबाबदाऱ्या स्वीकाऱ्याव्या लागतील. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील. 

वृषभ - दिवस चांगला आहे. सर्व अडचणींवर मात कराल. उत्पन्न आणि खर्चाकडे विषेश लक्ष द्या. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. 

मिथुन - अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना सहकाऱ्यांची मदत घ्या. 

कर्क - अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. संकटातून मार्ग काढण्यासाठी मित्र मदत करतील. कामकाजासंबंधित चांगले विचार डोक्यात येतील. अनेक गोष्टींचा निवाडा आज लागेल. 

सिंह - आर्थिक स्थितीत बदल जाणवतील. त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. अपेक्षांवर आवर घाला.  दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या - दिवस चांगला आहे. भावनांवर संयम ठेवा. नव्या व्यक्तीसोबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींकडून मदत मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे.

तुळ : नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

श्चिक : तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या करियरवर असेल. तुम्ही थोडे मुडी आणि संवेदनशील व्हाल. दिवस सामान्य असेल. सुखद घटना घडतील. परिवारासोबत दिवस चांगला जाईल. तुम्हाला जी आज अडचण वाटेल ती तुमच्यासाठी सकारात्मक बनेल. 

मकर : तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. सोबतच्या व्यक्तींची मदत मिळेल. 

कुंभ : महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.

मीन : रोजच्या आणि भागिदारी असलेल्या कामांमधून सुटका होईल. भावंडांकडून आणि मित्र परिवाराकडून मदत मिळेल. लोकांशी खूप गप्पा मारण्याचे योग आहेत. मेहनत जास्त असेल पण यश देखील मिळेल.