Horoscope 12 January 2023 : आजचा दिवस तुम्हीच गाजवणार, पाहा कोणत्या राशीला मिळणार गुरुचं बळ....

Horoscope 12 January 2023 : मोठ्यांचे आशीर्वाद, नवा सोन्याचा दागिना आणि खूप काही... पाहा तुमच्या राशीला आज नेमका कसा फायदा होणार

Updated: Jan 12, 2023, 07:30 AM IST
Horoscope 12 January 2023 : आजचा दिवस तुम्हीच गाजवणार, पाहा कोणत्या राशीला मिळणार गुरुचं बळ....  title=
Remedies and Astrology Tips to Avoid Evil Forces precautions while walking on street

Horoscope 12 January 2023 : आज गुरुवार. या आठवड्याचा शेवट आता जवळच आहे असं सांगणारा हा दिवस. अनेकांच्या आजच्या या नव्या दिवसाची सुरुवात झालीये. पण, त्याआधी पाहून घ्या काय सांगतंय आजचं राशीभविष्य.... 

मेष (Today Aries Horoscope)
आज विवाहोत्सुकांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. मित्रांची मदत मिळेल. अडकलेली कामं मार्गी लागतील चिंता करू नका. 

वृषभ (Today Taurus Horoscope)
कौटुंबीक समस्या दूर होणार आहेत. दुखापती बऱ्या होतील. आज एखाद्या ठिकाणी तुम्ही जास्त खर्च करू शकाल. गरजवंतांना मदत करा. 

मिथुन (Gemini Horoscope Today)
आर्थिक समस्या दूर होणार आहेत. नोकरीच्या चिंता मिटतील. आजच्या दिवशी एखादा गोड पदार्थ करून देवापुढे ठेवा. कृतज्ञता व्यक्त करा. 

कर्क (Cancer Horoscope Today)
मन स्थिर होईल. आज ध्यानधारणेसाठी वेळ द्या. दाम्पत्यजीवनात आनंद असेल. दिवस सुखाचा जाईल. 

सिंह (Leo Rashifal Today)
वैवाहिक आयुष्यात आनंदाची बरसात होईल. भाऊ- बहिणीमध्ये असणारे वाद मिटतील. आज मन प्रसन्न असेल. 

कन्या (Horoscope Virgo Today)
नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर आज आनंचा दिवस आहे. देवाणघेवाणीच्या मुद्द्यांवर चर्चा करा. आज कुटुंबाला वेळ द्या. 

तुळ (Libra Horoscope Today)
आज आईचे सर्व कष्ट फळणार आहेत. आज तुम्ही तिच्यासाठी असं एखादं काम कराल ज्यामुळं तिचा आनंद गगनातही मावणार नाही. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
नात्यांमध्ये असणारे मतभेद दूर होणार आहेत. आजचा दिवस काहीसा भावनिक आहे. नोकरीमध्ये फायदा होणार आहे. 

धनु (Sagittarius Horoscope Today)
आज वडिलांची साथ मिळणार आहे. त्यांचा सल्ला तुम्हाला मोठ्या संकटातूनही तारणार आहे. अडकलेली सर्व कामं दूर होतील. 

हेसुद्धा वाचा : Astrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण 

मकर (Today Capricorn Rashifal)
मित्रांसोबत असणारे सर्व वाद दूर होणार आहेत. आज प्रवास घडणार आहे. घरामध्ये सुखशांती नांदणार आहे. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)
सरकारी नोकरीसाठी अर्ज करा. आज यश मिळणार आहे. कुटंबासोबत असणारे मतभेद दूर होणार आहेत. सर्व मतभेद संपल्यामुळं मन शांत असेल. 

मीन (Pisces Rashifal Today)
आज तुम्हाला गुरुचं बळ मिळणार आहे. शुभकार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. वडिलांशी असणारं नातं आणखी घट्ट होणार आहे. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)