राशीभविष्य : 'या' राशींचा आज भाग्योदय

पहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Aug 16, 2020, 07:52 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींचा आज भाग्योदय

मेष- आत्मविशावास वाढेल.  अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्साही आहे. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. 

Add Zee News as a Preferred Source

वृषभ- कामात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी इतरांकडून आदर मिळेल. मेहनत करा. मागील कैक दिवसांपासून अपूर्ण असणारी सर्व कामं आज मार्गी लावा. नव्या व्यक्तींना भेटण्याचे योग आहेत. भाग्योदयासाठी आजचा दिवस शुभ आहे आणि तशी चिन्हंही आहेत. 

मिथुन- अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. वायफळ खर्चाला आळा घाला. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असल्यास ती परिस्थिती निभावून न्या. पोटाचे विकार उदभवू शकतात. 

कर्क- नव्या व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरीमध्ये बदल होतील. उत्पन्न वाढेल. काही जुन्या योजना अचानक लक्षात येतील. वरिष्ठांकडून सहयोग लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या. काही नवीन करण्याची इच्छा असेल. 

सिंह- अडकलेले पैसे मिळतील. मेहनतीला उत्तम यश मिळेल. जीवनसाथीकडून मदत मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. अविवाहित लोकांसाठी दिवस चांगला. विवाहाचे प्रस्ताव देखील येतील. 

कन्या- कामाची व्याप्ती वाढवाल. कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. काही खास आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा तुमच्या भाग्योदयास हातभार लागणार आहे. दिवसभर काहीसा थकवा जाणवेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या फायद्याची फिकिर करा. चतुराईनं कामं पूर्णत्वास न्या. रागावर नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक- व्यायपारात होणाऱ्या फायद्याचं प्रमाण कमीच असेल. बदलीचे योग आहेत. दिवस आव्हानात्मक असेल. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील. अविवाहितांना प्रेमंसंबंधांमध्ये येण्याची संधी मिळेल. 

धनु- दैनंदिन कामं पूर्णत्वास न्याल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील. आरोग्याची काळजी घ्या. साथीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल.

मकर- नवे करार कराल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. तुम्ही आखलेले बेत गुलदस्त्यात ठेवा. वादात अडकू नका. 

कुंभ- आर्थिक चणचण संपुष्टात येईल. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी सुरळीत असतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीर बाळगा, आनंद मिळेल. 

मीन- व्यापार वाढवण्याचा विचार करा. फायदा होईल. आज पैशांच्या बाबतीत पाऊल सावधगिरीनं टाका. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

About the Author