Horoscope : नशिबाचे दरवाजे उघडणार आजचा शनिवार

असा असेल आजचा दिवस 

Updated: Oct 16, 2021, 06:59 AM IST
Horoscope : नशिबाचे दरवाजे उघडणार आजचा शनिवार title=

मुंबई : शनिवारी भाग्य तुमच्यासोबत असेल. कामात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने कठीण रस्ता सोपा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. 

मेष : शनिवारी भाग्य तुमच्यासोबत असेल. जवळच्या व्यक्तींसोबत चांगला वेळ घालवाल. नव्या योजनेत गुंतवणूक करा. आज चांगला वेळ घालवाल. कामकाजाचा वेळ तुमच्यासाठी लाभदायक असेल. 

वृषभ : शनिवारी कामात चांगल यश मिळेल. तुमची मेहनत आणि भाग्य सोबत असेल. कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. 

मिथुन : कोणाशीही अनावश्यक वाद होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला शनिवारी चांगला राहील. शरीर उत्तम साथ देईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.

कर्क : तुम्ही तुमची प्रत्येक कामे अगदी सहज पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या मदतीमुळे नवीन काही शिकण्याची संधी मिळेल, मनात आनंद दिसून येईल.

सिंह : कामासाठी शनिवार चांगला असेल. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत.

कन्या : तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. एखाद्याच्या शिक्षकांबद्दल आणि वडिलांबद्दल मनात आदर भावना वाढेल.

तूळ : तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व मिळू देणार नाही, तुम्ही त्यांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. आपण भाग्यवान ठरणार आहात. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेरचा प्रवास होईल. कुटुंबाचा चांगला पाठिंबा मिळेल. शनिवार देखील आरोग्यासाठी चांगला आहे.

वृश्चिक : तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुमची कामे सहज पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंधांमध्ये गोडवा येईल. तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल.

धनू : तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुमची कामे सहज पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंधांमध्ये गोडवा येईल. तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल.

मकर : आपल्यापेक्षा मोठ्या आणि ज्येष्ठ व्यक्तींकडून चांगला सन्मान मिळेल. शनिवारची सुरूवात अतिशय चांगली असेल. कामातून चांगल धन मिळेल. 

कुंभ : तुमचे वर्तन खूप सौम्य असणार आहे. वागण्यात बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. तुम्ही तुमच्या कामात परिश्रमपूर्वक काम कराल आणि कोणाच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

मीन : तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. शनिवारी नशिबाला चांगली साथ मिळेल.