Horoscope 17 March 2022: या राशीच्या व्यक्तींना जोडीदाराची साथ मिळणार नाही

जाणून घ्या कसं असेल तुमचं आजचं राशीभविष्य.

Updated: Mar 17, 2022, 07:39 AM IST
Horoscope 17 March 2022: या राशीच्या व्यक्तींना जोडीदाराची साथ मिळणार नाही title=

मुंबई : सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुवार हा शुभ काळ ठरणार नाहीये. दुसरीकडे, तूळ राशीचे लोक प्रेम प्रकरणांच्या बाबतीत भाग्यवान असणार आहेत. जाणून घ्या कसं असेल तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष (Aries)

या गुरुवारी जर तुम्ही वेळेत मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर व्यावसायिक जीवनात तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकणार आहेत.

वृषभ (Taurus)

गुरुवारी तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडण्यास मदत होणार आहे.

मिथुन (Gemini)

या गुरुवारी तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. सोबतच तुमचं कौटुंबिक जीवन आनंदात राहील. तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रांशी असलेले तुमचे संबंध सुधारतील.

कर्क (Cancer)

गुरुवारी तुम्ही घेत असलेल्या निर्णयांकडे योग्य लक्ष द्या. कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिंह (Leo)

हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. भावंडांशी असलेल्या वादामुळे कुटुंबातील जीवनात अस्थिरता येऊ शकते. 

कन्या (Virgo)

या गुरुवारी तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्यांचा उपयोग करून तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक जीवनात अडथळे येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याची बिघडलेली तब्येत आणि प्रॉपर्टीच्या वादामुळे तुम्ही सतत तणावात राहाल.

तूळ (Libra)

व्यवसायाच्या संदर्भात नवीन व्यावसायिक संबंधांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान राहणार आहात. 

वृश्चिक (Scorpio)

या गुरुवारी तुम्ही नवं असोसिएशन किंवा भागीदारीत प्रवेश करू शकता. तुमची कोणतेही कायदेशीर प्रकरणं प्रलंबित असेल तर तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल.

धनू (Sagittarius)

तुम्हाला तुमच्या जोडीदाराची किंवा सहकाऱ्यांची पूर्ण मनाने साथ मिळणार नाही. यामुळे तुम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळ आणि तणावात टाकेल. 

मकर (Capricorn)

गुरुवारी तुमची व्यावसायिक प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाची प्रशंसा करू शकता. तुमच्यापैकी काही जण नवीन असोसिएशन किंवा भागीदारीत प्रवेश करू शकतात. तुमचे विरोधक तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. 

कुंभ (Aquarius)

या गुरुवारी तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळणार आहे. व्यवसायिकांना भागीदारी किंवा सहवासातून चांगला नफा मिळू शकतो. याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

मीन (Pisces)

तुमच्यापैकी काहींसाठी गुरुवार चांगला ठरणार नाहीये. तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचं भांडवल करून खेळ खराब करण्याचं काम करतील.