Horoscope 18 September: तुळसह 5 राशीच्या लोकांनी करू नका ही चूक, अन्यथा होईल मोठं नुकसान

रोजचा दिवस एकसारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी एकामागोमाग संकटं, सहा राशीच्या व्यक्तींसाठी शनिवारचा दिवस अत्यंत वाईट असणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी वेळीच काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

Updated: Sep 17, 2021, 10:01 PM IST
Horoscope 18 September: तुळसह 5 राशीच्या लोकांनी करू नका ही चूक, अन्यथा होईल मोठं नुकसान

मुंबई: रोजचा दिवस एकसारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी एकामागोमाग संकटं, सहा राशीच्या व्यक्तींसाठी शनिवारचा दिवस अत्यंत वाईट असणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी वेळीच काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

मेष: आपल्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होतील. मन प्रसन्न राहील. रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर तुमचं नुकसान होईल. 

वृषभ: कामाच्या ठिकाणी आपल्याला फायदा मिळणार आहे. आपल्याला चांगली वागणूक मिळेल. व्यवसायासाठी उत्तम योग आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. प्रमोशन होण्याची शक्यता आहे.

मिथुन: कुटुंबासाठी व्यस्त कामातून थोडासा वेळ काढाल. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल. परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. 

कर्क: आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. संपूर्ण दिवस बेचैन असाल. कामाच्या ठिकाणी फायदा मिळेल. भाग्य साथ देईल.

सिंह: या राशीच्या लोकांसाठी शनिवार चांगला दिवस ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रतिभा दाखवण्यात यशस्वी ठराल. सकारात्मक रहा फायदा होईल.

कन्या:  कोर्टाच्या कामात आपल्याला थोडा दिलासा मिळू शकतो. तुमची बुद्धीमत्ता आणि चतुराई दाखवण्याचा उत्तम दिवस आहे.

तुळ: कुटुंब आणि प्रेमात समजुदारपणा दाखवावा लागेल. व्यावहार आणि व्यवसाय प्रामाणिकपणे करा. पार्टनरला समजण्यात कमी पडाल.

वृश्चिक: दुसऱ्यांचे योग्य सल्ले घ्या. अधिकाऱ्यांशी आपली खास ओळख होईल. अनावश्यक खर्चांवर आळा घालणं गरजेचं आहे. 

धनु: छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावणं सोडून द्या. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. 

मकर: मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. व्यवहारासाठी चांगला दिवस आहे. 

कुंभ: शनिवारी आपल्या क्षेत्रात चांगली प्रगती होईल. पैसा चांगल्या कामासाठी खर्च होईल. शत्रूंना आपल्यावर वर्चस्व गाचवण्याची संधी देऊ नका.

मीन: आपल्याला चांगली बातमी मिळेल. चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. प्रलोभनापासून दूर राहा प्रयत्न करत राहा.

Tags: