के एल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील कथित वादादरम्यान अथिया शेट्टीची पोस्ट व्हायरल, 'वादळानंतर...'

Athiya Shetty Shares Cryptic Post: लखनऊचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul) आणि संघमालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील कथित वाद रंगला असतानाच के एल राहुलती पत्नी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) इंस्टाग्रामला (Instagram) पोस्ट शेअर केली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 14, 2024, 06:45 PM IST
के एल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील कथित वादादरम्यान अथिया शेट्टीची पोस्ट व्हायरल, 'वादळानंतर...' title=

Athiya Shetty Shares Cryptic Post: लखनऊचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul) आणि संघमालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद रंगला आहे. संजीव गोयंका यांनी मैदानात सर्वांसमोर के एल राहुलला झापल्याने क्रिकेटप्रेमी तसंच माजी क्रिकेटर नाराजी व्यक्त करत आहेत. या अपमानामुळे के एल राहुल आयपीएल हंगामानंतर लखनऊ संघ सोडणार असल्याची चर्चाही रंगली आहे. के एल राहुल आणि संजीव  गोयंका यांच्यातील कथित वाद चर्चेत असतानाच के एल राहुलती पत्नी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) इंस्टाग्रामला (Instagram) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. 

मागच्या आठवड्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊचा 10 गडी राखत लाजिरवाणा पराभव केला होता. या पराभवामुळे संतापलेल्या संजीव गोयंका यांनी मैदानातच कर्णधार के एल राहुलवर आपला संताप व्यक्त केला होता. एखाद्या खेळाडूला अशी वागणूक देणं योग्य नाही अशा शब्दात संजीव गोयंका यांच्यावर टीका करण्यात आली. यादरम्यान अथिया शेट्टीने इंस्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने आकाशाचा फोटो शेअर केला असून, 'वादळानंतरची शांतता' अशी कॅप्शन दिली आहे. आता अथिया शेट्टीने संजीव गोयंका वादावर पोस्ट केली आहे की, काल मुंबईत आलेल्या पावसाचा संदर्भ आहे हे तिच सांगू शकते. पण चाहत्यांना मात्र तिचा रोख संजीव गोयंका यांच्याकडे असल्याचं म्हणत आहेत. 

'तुमच्याकडे जर साधं...', सेहवागने के एल राहुलवर भरमैदानात ओरडणाऱ्या संजीव गोयंकांना सुनावलं, 'जर असंच वागलात...'

 

के एल राहुल आणि संजीव गोयंका यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर मत मांडलं आहे. लखनऊचा सहाय्यक प्रशिक्षक क्लुसनरने यात फार काही मोठं नसल्याचं म्हटलं आहे. "दोन क्रिकेटप्रेमींमधील जोरदार चर्चेत मला कोणतीही अडचण दिसत नाही. आमच्यासाठी ते चहाच्या कपातील वादळ आहे. आमच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही," असं त्याने म्हटलं आहे. 

विरेंद्र सेहवागचा संताप

दुसरीकडे विरेंद्र सेहवागने मात्र आपला संताप व्यक्त केला आहे. "हे सर्वजण व्यावसायिक आहेत. त्यांना फक्त नफा आणि तोटा कळतो. पण येथे काहीच तोटा नाही. मग त्यांना नेमकी कशाची चिंता सतावत आहे? तुम्ही 400 कोटींचा नफा कमवत आहात. हा एक व्यावसाय असून, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. याची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे लोक आहेत. काहीही झालं तरी तुम्ही नफा कमावत आहात. त्यामुळे तुमचं काम फक्त खेळाडूंचं मनोबल वाढवणं आहे. आयपीएलमध्ये खेळाडू जर मी एक संघ सोडला तर दुसरा संघ घेईल असा विचार करतो. जर तुम्ही खेळाडू गमावला तर जिंकण्याची संधी शून्य होते," असं विरेंद्र सेहवागने सांगितलं.

“मालकाची भूमिका अशी असली पाहिजे की जेव्हा ते खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये किंवा पत्रकार परिषदेदरम्यान तेव्हा केवळ त्यांना प्रेरित करण्यासाठी बोललं पाहिजे. पण मालकाने येऊन जर 'काय चाललंय? समस्या काय आहे?' असं विचारलं तर? किंवा संघ व्यवस्थापन सदस्यांपैकी एकाला पकडलं आणि एखाद्या विशिष्ट खेळाडूबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली? प्रशिक्षक आणि कर्णधार हे संघ चालवत असतात त्यामुळे या मालकांनी खेळाडूंशी संबंध न ठेवणे किंवा त्यांच्यावर रागावणं चांगलं नाही," असं तो म्हणाला.

IPL 2024: आयपीएलमध्ये आता प्लेऑफला पात्र होण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) दारुण पराभव केला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर के एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 2022 मध्ये 17 कोटीत खरेदी करण्यात आलेल्या के एल राहुलला लखनऊ संघ 2025 च्या लिलावात पुन्हा रिटेन न करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे के एल राहुल स्वत:च पुढील दोन सामन्यात फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या हेतूने कर्णधारपद सोडू शकतो असं बोललं जात आहे.