राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नव्या संधीसह खास ठरेल आजचा दिवस

जाणून घ्या काय सांगतं आजचं राशीभविष्य 

Updated: Oct 20, 2020, 06:55 AM IST
राशीभविष्य : 'या'  राशीच्या व्यक्तींसाठी नव्या संधीसह खास ठरेल आजचा दिवस
संग्रहित छायाचित्र

मेष- कोणा एका मोठ्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर शांत राहा. निर्णय चांगलाच असेल. एखाद्या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. 

वृषभ- जास्तीत जास्त लोकांवर तुमचा प्रभाव असणार आहे. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. कुटुंबासमवेत असणारे मतभेद दूर होतील. 

मिथुन- दैनंदिन कामं पूर्ण होतील. जबाबदारी लक्षात घ्या. आज शांत राहा. अतीघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. 

कर्क- अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. करिअरच्या वाटेवरही नव्या संधी मिळतील. जुनी कामं मार्गी लागतील. एखादी आनंदाची बातमी मिळेल. 

सिंह- आज कोणत्याही कामात टाळाटाळ करु नका. नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवा. 

कन्या- आजचा दिवस चांगला आहे. भावनांवर मात्र नियंत्रण ठेवा. प्रेम व्यक्त करण्यात संकोचलेपणा नको. मानसिक स्थैर्य लाभेल. 

तुळ- परिस्थिती बदलण्याची संधी तुमच्यापुढं चालून येणार आहे. धैर्यानं पुढे जा. चांगल्या व्यवहारामुळं तुमची प्रशंसा केली जाईल. कामात मन रमेल. 

वृश्चिक - अडचणीची वाटणारी सर्व कामं अगदी सहपणे पूर्ण होतील. बरीच कामं मार्गी लागतील. धनलाभाचा योग आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. 

धनु- बऱ्याच काळापासून बेत आखत होतात अशी सर्व कामं पूर्ण होतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. स्वत:वर विश्वास ठेवा. 

मकर- बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कोणतंही मोठं काम हाती घेण्यापूर्वी विचार करा. शारीरिक व्याधी दूर होतील. 

 

कुंभ- तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वसामान्य आहे. अडचणींतून सावराल. आर्थिक क्षेत्रात प्रगती होणार आहे. जुनी कामं मार्गी लागतील. एखादी शुभवार्ता मिळेल. 

मीन- दैनंदिन कामं आणि भागीदारीची कामं मार्गी लागतील. मित्र आणि भावंडांची मदत मिळणार आहे. मानसिक स्थैर्य लाभणार आहे.