Horoscope 27 November 2021 | शनिवारी या राशींना धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

शनिवारचा दिवस (Horoscope 27 November 2021) कसा असेल, जाणून घेूऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. 

Updated: Nov 26, 2021, 10:32 PM IST
Horoscope 27 November 2021 | शनिवारी या राशींना धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

मुंबई : शनिवारी (Horoscope 27 November 2021) मेष आणि वृषभ या 2 राशींना धनलाभ होईल. तब्येतीमुळे कुंभ राशीच्या लोकांना अस्वस्थता जाणवेल. शनिवारचा दिवस कसा असेल, जाणून घेूऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 27 November 2021 know your astrology prediction)

मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहपूर्ण असणार आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. कामात धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहिली. एकूणच शनिवार तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. 

वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी सर्वांसोबत चांगल्याने वागाल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी मदत मिळेल. धन कमावण्याच्या प्रयत्नात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुख लाभेल.  

मिथुन (Gemini) : कुटुंबियांकडे लक्ष द्या. त्यांना काय हवं नको ते पाहा. कुटुंबियांसाठी कामातून वेळ काढा. भाग्य तुमच्यासोबत  आहे. 

कर्क (Cancer) : दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीत धनलाभ होईल. पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना फायदा होईल. 

सिंह (Leo) : भाग्य तुमच्यासोबत आहे. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. शुभ कार्यात सहभागी व्हाल. 

कन्या (Virgo) : कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. पैसे योग्य ठिकाणी आणि उपयोगी वस्तू घेण्यात खर्च कराल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील मात्र मनात भिती असेल. व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

तुळ (Libra) : आर्थिक व्यवहारांसदर्भात आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. मित्रांची भेट होऊ शकते. मन प्रसन्न राहिल. उत्साह जाणवेल. भाग्य तुमच्यासोबत आहे.  

वृश्चिक (Scorpio) : तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे दिवसभर अस्वस्थता वाटेल. कामात मिळालेल्या सहकाऱ्याच्या मदतीमुळे धनलाभ होईल. भाग्याची पूर्ण साथ आहे. 

धनु (Sagittarius) : नशिबाची पूर्ण साथ मिळेल. न्यायालयीन कामकाजातून दिलासा मिळेल. हुशारीच्या जोरावर केलेल्या कामात यशस्वी व्हाल. 

मकर (Capricorn) : कार्यालयीन ठिकाणी आजचा दिवस लाभदायक आहे. सर्वांसोबत चांगल्याने व्यवहार कराल. व्यवसायात लाभदायक स्थिती असेल. लोकांकडून मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल.

कुंभ (Aquarius) : तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे दिवसभर अस्वस्थता वाटेल. व्यापार आणि व्यवसायासाठी दिवस योग्य आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागणार नाही. 

मीन (Pisces) : भाग्याची साथ मिळेल. विद्यार्थी अभ्यासात बुद्धिमत्तेच्या आधारावर यशस्वी होतील.