Horoscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा

सोमवार नवीन आशा घेऊन येईल. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग दिसतील. आपला छंद किंवा कौशल्य जपण्याचा प्रयत्न करा. 

Updated: Sep 26, 2021, 11:10 PM IST
Horoscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा

मुंबई: सोमवार नवीन आशा घेऊन येईल. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग दिसतील. आपला छंद किंवा कौशल्य जपण्याचा प्रयत्न करा. जमीन किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला नक्की घ्या, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. खगोल गुरु बेजान दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल जाणून घेऊया. 

मेष: हातात येणारं काम तुम्ही नीट विचारपूर्वक करा. कोर्टाच्या कामातून तुम्ही सुटका करू शकता. कोणतीही जोखीम उचलणं टाळा. 

वृषभ: तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नफ्याचे नवे मार्ग सापडतील. अनेक प्रलोभनं आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याच काळापासून अडकलेली गोष्ट पूर्ण होईल. 

मिथुन: स्वत:साठी वेळ काढा. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी दिवस खूप उत्तम आहे. उत्पन्न चांगले राहील. पटकन यश मिळवण्याच्या नादात चुका करू नका. 

कर्क: तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. प्रॉपर्टी डीलरसाठी सोमवार अधिक फायदेशीर आहे. खर्चावर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

सिंह : दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल करा फायदा होईल. 

कन्या: आपलं मन आनंदी राहील. ऑफिसमध्ये बॉस खुश राहील. डोकं लावून काम करा नाहीतर नुकसान होईल. 

तुळ: मन प्रसन्न राहील. व्यापाऱ्यांसाठी खूप उत्तम दिवस आहे. पटकन कोणावरही विश्वास ठेवणं घातक ठरेल. 

वृश्चिक: तुम्हाला नवीन दागिने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. पैसे लवकर मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका, काळजी घ्या.

धनु: आपल्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचे कोणतेही छंद किंवा कौशल्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल.

मकर: दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. घरून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात.

कुंभ: छोट्या गोष्टींवर राग येणे टाळले पाहिजे. व्यवसाय करण्याआधी नियोजन आवश्यक आहे. अडलेलं काम पुन्हा सुरू करू शकता. 

मीन: तुमचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात.

Tags: