Horoscope October 28, 2021: गुरुवारी 5 राशींच्या लोकांचं उजळणार भाग्य, धनलाभ होण्याची शक्यता

 गुरुवारी काही राशींच्या लोकांसाठी प्रवासाचा योग आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. 

Updated: Oct 27, 2021, 08:34 PM IST
Horoscope October 28, 2021: गुरुवारी 5 राशींच्या लोकांचं उजळणार भाग्य, धनलाभ होण्याची शक्यता

मुंबई : गुरुवारी काही राशींच्या लोकांसाठी प्रवासाचा योग आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. तुमचं मूल जे करेल त्याचा अभिमान वाटेल. वैयक्तिक वाद टाळण्याचा प्रयत्न करा अन्यथा नुकसान होऊ शकते. खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून गुरुवार 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया.

मेष : गुरुवार या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ दिवस असणार आहे. यामागचं कारण म्हणजे भाग्य या लोकांना उत्तम साथ देणार आहे. कुटुंबात आनंदाची परिस्थिती राहील. कुटुंबाचं नाव उज्ज्वल होईल असं काम कराल. तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील आणि पैसे गुंतवले जातील. तुमचा दिवस चांगला जाणार आहे.

वृषभ : नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नतीबाबत चर्चा होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल. आपल्या माणसासोबत चांगला वेळ घालवा. कामाच्या ठिकाणीही चांगली स्थिती दिसून येईल.

मिथुन: विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. कोणालाही कर्ज देणे टाळा. व्यवसाय आणि पैशासाठी दिवस संमिश्र राहील. पोटाच्या समस्या असतील. खाण्यापिण्याची थोडी काळजी घ्या, नाहीतर गॅसची समस्या होऊ शकते. तुमचं भाग्य साथ देईल.

कर्क : तुमच्या कामामुळे तुम्हाला भाग्य साथ देईल. कामात मोठं यश मिळेल. विचारपूर्वक बोला आणि कारण नसेल तर बोलणं टाळा. तुमच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर करा. 

सिंह : तुमची अनेक लोकांशी चर्चा होईल आणि चांगले संबंध निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. तुमच्यावर अनेक खरे खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहणे योग्य राहील. चांगले लोक भेटतील जे तुम्हाला कामासाठी मार्गदर्शन करतील. 

कन्या : गुरुवारी या राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील. प्रवासाचा योग आहे. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. पैसे गुंतवण्यासाठी दिवस चांगला. तुम्ही पॉलिसी आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

तुळ : कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. सतत रागवत राहिलात तर तुमचा त्रास वाढू शकतो. देवाचं नाव घेतल्यास आपल्याला मनःशांती मिळेल. शैक्षणिक आघाडीवर सतत प्रयत्न केल्यामुळे काही खास व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंब किंवा प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल. नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होईल. 

धनु : तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे. कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. रागावर वर्चस्व गाजवू देऊ नका, तर तुम्हाला चांगला दिवस येईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मकर : भाग्य तुमची साथ देईल. मानसिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. प्रगतीसाठी मेहनत कराल. कामात लाभदायक परिस्थिती राहील. 

कुंभ : सहकाऱ्यांशी काही जुन्या विषयावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक काम करून वाद टाळा. वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास बरे होईल. 

मीन : कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. या राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र असणार आहे.