आजचे राशीभविष्य | ३१ ऑक्टोबर २०१९ | गुरुवार

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Oct 31, 2019, 08:18 AM IST
आजचे राशीभविष्य | ३१ ऑक्टोबर २०१९ | गुरुवार  title=
आजचे राशीभविष्य | ३१ ऑक्टोबर २०१९ | गुरुवार

मेष - आज तुम्हाला तुमचं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल. 

वृषभ - भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे. 

मिथुन- पैशांची चणचण भासणार नाही. अचानक धनलाभ होऊ शकतो. कोणाच्या मनात काय सुरु आहे, हे तुम्हाला लगेच कळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अडकलेली कामं पूर्ण होतील. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या योजनेचा फायदा होईल. आज घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसतील. कामाच्या निमित्त्ताने एखादा प्रवासयोग संभवतो. 

सिंह- कोणा एका व्यक्तीसोबतचं नातं सुधारेल. आत्मविश्वासाचा फायदा होईल. सवयींवर लक्ष ठेवा. दिवस सर्वसामान्य असेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल. 

कन्या- एखादं वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. आज तुम्ही भावनात्मक असाल. साथीदाराची साथ मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

तुळ- दुवस तुमच्यासाठी सर्वसामान्य आहे. आज जास्त मेहनत करावी लागू शकते. एखादं नवं काम कराल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नव्या मित्रांची भेट फायद्याची ठरेल. 

वृश्चिक- कमीत कमी वेळात जास्त काम आटोपण्याचा प्रयत्न कराल.  एखादी शुभवार्ता कळेल. व्यवसायात फायदा होईल. जमीन आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांत नशीबाची साथ असेल. 

धनू- एखादं खास काम कुटुंबाच्याच मदतीने पूर्ण कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीतील ताण दूर होईल. पूर्ण झालेल्या कामांचा फायदा होण्यास सुरुवात होईल. 

मकर- हाताशी जास्तीचा वेळ ठेवा. आज कामं थोडी जास्त वेळासाठी चालतील. परिस्थिती तुमच्या पक्षात आहे. तुमचं मत स्पष्टपणे इतरांसमोर मांडा. 

कुंभ- कामाच्या व्यापामुळे तुम्हाला इतरांकडून आदर, सन्मान मिळेल. खर्च आणि गुंतवणुकीची आखणी कराल. इतरांकडून मदत मिळेल. 

मीन- काम पूर्ण करतेवेळी इतरांची मदत मिळेल. एखादं जुनं कर्ज फेडाल. नात्यांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल.