Horoscope 8 October 2021 : 4 राशीच्या व्यक्तींना शुक्रवारी राहावं लागणार सतर्क

प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. नवरात्र उत्सवातील दुसरा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार? 

Updated: Oct 7, 2021, 11:18 PM IST
Horoscope 8 October 2021 : 4 राशीच्या व्यक्तींना शुक्रवारी राहावं लागणार सतर्क title=

मुंबई: प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. नवरात्र उत्सवातील दुसरा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार? कोणत्या राशींच्या व्यक्तींना घ्यावी लागणार काळजी?  खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया 12 राशींसाठी शुक्रवार कसा असणार आहे. 

मेष: या राशीच्या व्यक्तींची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्ही चांगली प्रगती कराल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याचे नवीन मार्गही सापडतील.

वृषभ: हा तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्न आगामी काळात तुमच्या यशात आणि प्रगतीमध्ये योगदान देतील.

मिथुन: कामाच्या ठिकाणी करियरच्या दृष्टीनं वेगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. अधिकारी आपला संभ्रम निर्माण करू शकतात. आपल्या कामाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्या.

कर्क: आयत्यावेळी काही गोष्टींमध्ये बदल करावा लागू शकतो. आपल्या कामात यश मिळेल. आरोग्यासाठी चांगला दिवस असेल. 

सिंह: आर्थिकदृष्ट्या दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. 

कन्या:  चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी उत्तम दिवस आहे. प्रेमसंबंध सुधारतील त्यामुळे आपला फायदा होईल. 

तुळ: प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवास करताना विशेष काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. 

वृश्चिक: आपला आत्मविश्वास वाढेल. गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काळजी घ्या. 

धनु: सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवहार करताना काळजी घ्या. भावना समजून घ्या आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. 

मकर: कोणतीही गोष्ट करण्याआधी विचार करा. आज तुम्ही आनंदी असाल आणि शांतता आपल्याला हवी असेल. 

कुंभ: केलेल्या कठोर परिश्रमाचे आपल्याला योग्य फळ मिळेल. आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. 

मीन: आत्मविश्वास वाढेल आपला दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. समस्यांचा सामना करावा लागणार आहे. विशेष काळजी घ्या.