Horoscope 9 January 2022 : रविवारी या राशींच्या व्यक्तींनी सावध रहा

रविवार कोणत्या राशीकरता कसा असेल? आज जाणून घेऊया.

Updated: Jan 9, 2022, 08:15 AM IST
Horoscope 9 January 2022 : रविवारी या राशींच्या व्यक्तींनी सावध रहा title=

मुंबई : प्रत्येक दिवस वेगळा असतो. तर आजचा दिवस रविवार. आजचा रविवार कोणत्या राशीकरता कसा असेल? आज जाणून घेऊया.

मेष (Aries)

रविवारी तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि प्रवासाचा आनंद घ्याल. व्यवसायात चांगला फायदा होईल. दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होणार आहे. 

वृषभ (Taurus)

कामाच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. मनात आनंद राहील. रविवारी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा सन्मान करण्यात आघाडीवर राहाल.

मिथुन (Gemini)

तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्याच्या कल्पना मनात येतील. रविवारी भाग्य तुम्हाला साथ देईल. 

कर्क (Cancer)

तुमचा संपूर्ण दिवस एकदम फ्रेश जाईल, नोकरीत यश मिळेल त्याचसोबत व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक वाद संपतील. तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही.

सिंह (Leo)

तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला जीवन आनंदी ठेवण्यात मदत करतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. रविवारची सुरुवात चांगली होणार आहे. 

कन्या (Virgo)

रविवारचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह दिसेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra)

रविवारची सुरुवात चांगली होईल. कामासाठी किंवा कौटुंबिक आनंदासाठी रविवारचा दिवस चांगला जाणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

रविवारी नशीब तुमच्या सोबत आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचं काम यशस्वी कराल. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.

धनु (Sagittarius)

रविवारी कामात येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळेल. तुमची सर्व कामं यशस्वी होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही इतरांना दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. 

मकर (Capricorn)

रविवारचा दिवस फारसा चांगला जाणार नाही, तुम्हाला संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, अशा वेळी तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल. त्यामुळे हिंमत हरू नका.

कुंभ (Aquarius)

रविवारचा दिवस तुमच्यासाठी आठवणीचा दिवस असेल. तुमच्या हुशारीचा दाखला देत तुम्ही कामात यशस्वी व्हाल, नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल.

मीन (Pisces)

रविवारी नशीब तुमच्या सोबत आहे. कामात तुमची कामगिरी चांगली राहील.  तुमची मानसिक सुस्ती संपेल.

Tags: