मुंबई : नवीन वर्षात वृषभ राशीसाठी काय नवीन असणार आहे. आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती आणि आरोग्य़ याबाबत काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
राशी फळ - नवीन नर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नवी आशा आणि उत्साह घेऊन येणार आहे. या वर्षात डिसेंबर महिना अधिक लाभदायक ठरणार आहे.
करिअर- नव्या नोकरीचा शोध संपणार नाही. व्यवसायात व्यवहार करताना सावध राहा. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार आहे तर आधी व्यवस्थित प्लानिंग करुन घ्या. नोकरी करणाऱ्या व्यंक्तींसाठी जानेवारी ते मार्च चांगला महिना आहे. पदोन्नती आणि पगार वाढण्याचा योग आहे.
कौटुंबिक जीवन- कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार कराल. धार्मिक स्थळी जाण्याने समाधान मिळेल. घरात काही वैवहिक कार्यक्रम होऊ शकतात. नवीन सदस्य घरात येऊ शकतो. नात्यांमध्ये काही चढ-उतार पाहायला मिळतील.
आर्थिक स्थिती- आर्थिक व्यवहार करताना योग्य व्यक्तीसोबत करा. काही नको असलेले खर्च टाळा. खर्च करण्यावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. आर्थिक अडचण येऊ नये म्हणून योग्य नियोजन करा. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग मिळतील. मेहनत करण्याची तयारी ठेवा.
आरोग्य - या वर्षात आरोग्य सामन्य राहिल. काळजी न घेतल्यास अडचणींचा सामना करावाच लागतो. नेत्र, मधुमेह, कान नाक, घसा याची समस्या उद्भवू शकते. काळजी करत बसू नका. त्यावर योग्य तो उपचार घ्या.
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष मागच्या वर्षीपेक्षा चांगलं राहिल. काही जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाल. तर काही जबाबदाऱ्या आणखी वाढतील. मनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वाद धैर्याने सांभाळा.