मुंबई : नव्या वर्षाच्या आगमनासह हे नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे. हे सुद्धा जाणून घ्या. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 2019 हे वर्ष कसं असणार आहे. या वर्षात काय नवीन असणार आहे. वाचा सविस्तर
राशी फळ- नवीन वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी उत्कृष्ट लाभ, मान, यश देणारा ठरणार आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतो. सप्टेंबर हा महिना सर्वाक शुभ आणि भाग्यशाली आहे. या वर्षी तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
करिअर- कर्क राशीसाठी नोकरी आणि व्यवसाय यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. अनेक नव्या संधी चालून येतील. ऑफिसमध्ये तुमच्य़ा कामाचं कौतूक होईल. काही नवी कामे मिळू शकता. काही अडचणींचा सामना करावा लागेल.
कौटुंबिक जीवन- जीवनात काही तणाव संभवतो. परिवाराला वेळ द्या. परिवारासोबत वेळ घालवा. काही नवे मित्र बनतील. गाडी खरेदी करण्याचा योग आहे. प्रेम संबंधामध्ये देखील यश मिळेल.
आर्थिक स्थिती - तुमचं यश या वर्षात दुप्पट होईल. धन लाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रकरणांमध्ये काही वाद होऊ नये म्हणून काळजी घ्या. जानेवारी ते मार्च दरम्याने काही आर्थिक स्थिती बदलेल. कागदी व्यवहार करताना सावध रहा.
अधिक वाचा : मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल २०१९?
आरोग्य - नवीन वर्षात आरोग्याच्या काही समस्या नाही येणार पण दुर्लक्ष केल्यास काही अडचणी येतील. थायरॉईड, पोटाचे विकार अशा समस्यांपासून लांब राहा. अनावश्यक चिंता करु नका.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 2019 हे वर्ष उत्तम आहे. यशस्वी आणि प्रगती होईल. आई-वडिलांना विसरु नका. त्यांचा सल्ला घ्या. कुटुंबाला वेळ द्या. यामुळे नवीन उर्जेचा संचार होईल.