आजच्या काळात पैसा ही सर्वात मोठी गरज बनली आहे. प्रत्येक व्यक्तीला शक्य तितके पैसे हवे असतात जेणेकरुन त्याला त्याच्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते साध्य करता येईल. पैसे मिळवणे निःसंशयपणे सोपे नाही. परंतु ज्योतिषांवर विश्वास ठेवला तर वास्तूमध्ये अशी शक्ती आहे जी पैसा आकर्षित करण्यास मदत करते. असे मानले जाते की, जर तुम्ही तुमच्या घरात वास्तूनुसार काही बदल केले तर तुमच्या कमावलेल्या पैशात मोठी वाढ होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, अशा कागदपत्रांमध्ये ज्यामध्ये तुमच्या पैशाची माहिती असते, ती कधीही पूर्व आणि आग्नेय दिशेला ठेवू नयेत. यामध्ये तुम्ही ज्यामध्ये पैशाची गुंतवणूक केली असेल ते पेपर असू शकतात. जसे की, म्युच्यअल फंड, एसआयपी, शेअर्स असो किंवा जागेची गुंतवणूक केली असेल तर असे सगळे पेपर तुम्ही सांगितलेल्या दिशेला ठेवावीत.
वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कधीही उत्तर, पश्चिम किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवू नये. कारण यामध्ये तुमचा कचरा, नको असलेली गोष्ट टाकता. त्यामुळे ते नकारात्मक असते.
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता, जसे की तिजोरी किंवा कपाट, तुम्ही ते उत्तर किंवा पश्चिम दिशेकडे ठेवावे कारण उत्तर दिशा ही कुबेरची दिशा मानली जाते.
वास्तुशास्त्रानुसार, अन्न कधीही डस्टबिनमध्ये टाकू नये कारण ते सूचित करते की त्या घरात अन्नाचा आदर केला जात नाही. कुबेर अशा घरचा रागावून राहतो. अशावेळी तुम्ही कंपोस्ट खताच्या डब्याचा वापर करु शकता.
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात पाणी व्यर्थ वाहते तेथे संपत्ती कधीच टिकत नाही, म्हणून असे मानले जाते की, जर तुम्हाला तुमच्या घरात पैसा टिकून राहायचा असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील साधनांचा अपव्यय आणि अन्नाचा अपमान रोखावा लागेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )