Rakshabandhan 2022: श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीने या दिवशी राजा बलिला राखी बांधली होती. तेव्हापासून बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, अशी मान्यता आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहीण सुखी जीवनाची इच्छा व्यक्त करते, तर भाऊ रक्षा करण्याचा संकल्प करतो. पण शास्त्रामध्ये राखी बांधण्याचे काही नियम सांगितले आहे. त्यामुळे राखी बांधताना अशा चुका टाळणं गरजेचं आहे.
राखी बांधण्याची शुभ वेळ
श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजता समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, 11 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असल्यामुळे गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार, गुरुवारी, 11 ऑगस्टला पौर्णिमा असल्याने, या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधेल. या दिवशी राखी बांधण्यासाठी 12 वाजल्यानंतरची वेळ शुभ मानली आहे. या दिवशी 5:17 ते 6.18 ही वेळ शुभ आहे.
रक्षाबंधन शुभ योग
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:08 ते 12:59 पर्यंत
अमृत काळ: संध्याकाळी 06.55 ते 08.20 पर्यंत
रवि योग: सकाळी 06:07 ते 06:53 पर्यंत
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)