शुक्राचं राशी परिवर्तन या तीन राशींना देणार Good News! पुढचा आठवडा जाणार उत्साहात

शुक्र ग्रहाने 7 ऑगस्ट 2022 ला कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क राशीत शुक्र ग्रहाचं गोचर होताच सूर्य-शुक्र युती झाली आहे.

Updated: Aug 7, 2022, 12:39 PM IST
शुक्राचं राशी परिवर्तन या तीन राशींना देणार Good News! पुढचा आठवडा जाणार उत्साहात title=

Shukra Gochar August 2022: ज्योतिषशास्त्राबद्दल कायमच कुतुहूल असतं. ग्रहांच्या गोचरामुळे काय प्रभाव पडणार? याबाबत उत्सुकता असते. कारण ग्रहांचा गोचर आणि वैयक्तिक कुंडलीतील ग्रहाचं स्थान यावर अंदाज बांधले जातात. पण ग्रहांच्या गोचराचा सर्वसमावेश विचार केला तर, प्रत्येक राशीवर कमी अधिक प्रमाणात शुभ अशुभ परिणाम मिळतात. त्यामुळे 12 राशींना काय फळ मिळणार याबाबत भाकित केलं जातं. गोचर करताना ग्रह कोणत्या स्थानात आहे, यावर फळ ठरतं. दुसरीकडे एकापेक्षा दोन ग्रह एकाच राशीत आलं, तर शुभ अशुभ योगही तयार होतात. त्याचं फळही त्या त्या राशीनुसार ठरतं. 

शुक्र ग्रहाने 7 ऑगस्ट 2022 ला कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क राशीत शुक्र ग्रहाचं गोचर होताच सूर्य-शुक्र युती झाली आहे. यश, प्रेम, पैसा, करिअर या तीन राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि सूर्याची युती चांगली राहील. या लोकांना भरपूर पैसा आणि नवीन नोकरी, तसेच प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तीन राशींना सकारात्मक परिणाम जाणवतील. 

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राचा योग शुभ राहील. या लोकांना पैशांची अडचण दूर होऊ शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. करिअरही चांगले होईल. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहील.

कन्या : कर्क राशीत शुक्र आणि सूर्याची युती कन्या राशीला लाभदायी ठरेल.  उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. नवीन नोकरी किंवा प्रमोशन मिळू शकते. व्यापारी मोठे करार निश्चित करू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. एकंदरीत हा काळ पैसा आणि कामाच्या दृष्टीने खूप चांगला राहील. 

तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे.  शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या लोकांना नोकरीच्या बाबतीत मोठा फायदा होऊ शकतो. नवीन नोकरी मिळेल. तुमच्या आवडीचे काम मिळाल्याचा आनंद तुम्हाला मोठा दिलासा देईल. बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)