Krur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी

Sun Transit 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीत तीन ग्रहांचा क्रूर योग तयार होतो आहे. हा योग  4 राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Oct 13, 2023, 12:28 PM IST
Krur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी title=
In Navratri three planets will create Krur Yoga Due to Surya Gochar these zodiac sign will be careful

Sun Transit 2023 : सूर्यग्रहणानंतर लगचेच दुसऱ्या दिवशी नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीत सूर्य गोचरमुळे तीन ग्रहांचा क्रूर योग निर्माण होणार आहे. येत्या 18 ऑक्टोबरला सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशीत आधीपासून मंगळ आणि केतू ग्रह असल्यामुळे इथे त्रिग्रह योगातून क्रूर योग तयार होतो आहे. क्रूर आणि पापी ग्रहामुळे तयार झालेल्या या क्रूर योगामुळे  राशींच्या लोकांसाठी आयुष्यात वादळ येणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या लोकांन सूर्य गोचर काळात एक महिना उपाय सांगितला आहे. 

मेष (Aries Zodiac)

सूर्य गोचर प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना पुढील एक महिन्यात अनेक कौटुंबिक वादांचा सामना करावा लागणार आहे. एवढंच नाही तर या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक समस्या त्रासदायक ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बॉस आणि सहकाऱ्यांशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला फळ मिळणार नाही. कामाचा निकाल तुम्हाला उशिरा मिळणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

वृषभ राशीच्या लोकांसाठीही सूर्य गोचर धोकादायक ठरणार आहे. या काळात सूर्य तुमच्या राशीपासून सहाव्या भावात असणार आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची अधिक काळजी या एका महिन्यात घ्या. या काळात गाडी सावकाश चालवा अन्यथा अपघाताचा धोका आहे. तुमच्यावर जुने कर्ज असेल तर त्यात अनेक अडचणी निर्माण होणार आहे. त्याशिवाय न्यायालयीन प्रकरणात सावधगिरी बाळगा.

हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव

कन्या (Virgo Zodiac) 

सूर्य गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्रासदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला घाशाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. हा एक महिना तुम्हाला खूप सावध राहावं लागणार आहे. शक्य असल्यास, थंड अन्न खाऊ नका आणि धुळीपासूनही दूर रहा. आरोग्याबाबत बेफिकीर अजिबात राहू नका. तसंच काही मुद्द्यावरून कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

सूर्य गोचर हा वृश्चिक राशीच्या 12व्या भावात प्रवेश करणार आहे. तसंच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ सोबत असणार आहे. अशा स्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांना दुखापत, अपघात इत्यादींचा धोका निर्माण  होतो आहे. त्यामुळे एक महिना विशेष काळजी घ्या. या काळात तुम्हाला जास्त राग येणार आहे. तुम्ही केलेले काम बिघण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंधात काही गोष्टींवरून तणाव निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असणार आहे.

हेसुद्धा वाचा - Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)