5 Rajyoga Formed : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राजयोगांची निर्मिती होते. 9 फेब्रुवारी रोजी पंच दिव्य योग आणि राजयोग तयार झाला आहे. हे दोन्ही राजयोग 500 वर्षांनंतर निर्माण झाले. आदित्य मंगल योग, बुधादित्य योग, चतुर्ग्रही योग, महालक्ष्मी योग आणि सर्वार्थसिद्धी योग या दिवशी निर्माण झाला.
बुध आणि सूर्य मकर राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार झालाय. याशिवाय मकर राशीत मंगळ आणि सूर्याच्या संक्रमणामुळे आदित्य मंगल योग तयार झाला. तर सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होतोय. मकर राशीत मंगळ आणि चंद्राच्या प्रवेशामुळे महालक्ष्मी योग तयार झाला आहे. उच्च राशीत मंगळ असल्यामुळे रुचक योग तयार होत आहे.
या सर्व राजयोगांचा प्रभाव प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. या संयोगांमुळे काही राशी अशा आहेत, ज्यांच्या नशीबाचे दरवाजे उघडू शकणार आहेत. जाणून घेऊया या कोणत्या राशींच्या व्यक्तींना या वेळी फायदा मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी पंचराज योगाची निर्मिती खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होतील. व्यावहारिक कल्पना खूप चांगल्या असतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन खूप चांगले असणार आहे.
या पंचराज योगांच्या निर्मितीनेच वृषभ राशीच्या लोकांना यश मिळू शकणार आहे. या काळात तुम्ही कामानिमित्त परदेशात जाऊ शकता. वडील आणि वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. परदेशात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी पंचराज योग लाभदायक ठरणार आहे. कर्क राशीच्या व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. या काळात तुम्ही तुमचे काही नवीन काम सुरू करू शकता. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. वडिलोपार्जित मालमत्ताच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुम्हाला बढती आणि प्रोत्साहन मिळण्याची चांगली संधी आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)