Janaki Jayanti 2024 : 'या' दिवशी साजरी होणार जानकी जयंती; सीताजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या गोष्टी करा

Janaki Jayanti 2024 :  पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जानकी किंवा सीता जयंती साजरी करण्यात येते. कुटुंबाच्या सुख शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी यादिवशी महिला उपवास करतात. 

नेहा चौधरी | Updated: Feb 28, 2024, 01:44 PM IST
Janaki Jayanti 2024 : 'या' दिवशी साजरी होणार जानकी जयंती; सीताजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या गोष्टी करा title=
Janaki Jayanti 2024 will be celebrated on this day Do these things to get Sitaji blessings sita ashtami date and shubh muhurat in marathi

Janaki Jayanti 2024 : श्रीरामासोबत आपण लक्ष्मण आणि सीतेची पूजा करतो. हिंदू धर्मात सण, व्रत आणि आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या कुठल्या देवाला समर्पित असतो. देशात श्री प्रभू रामासह सीतेची पूजा करण्याचीही परंपरा आजही आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जानकी जयंती किंवा सीता अष्टमी साजरी करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी कुटुंबातील सुख शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. (Janaki Jayanti 2024 will be celebrated on this day Do these things to get Sitaji blessings sita ashtami date and shubh muhurat in marathi)

जानकी जयंतीचा शुभ मुहूर्त

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 03 मार्चला सकाळी 08:44 वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 04 मार्चला सकाळी 08:49 वाजेपर्यंत असणार आहे. धार्मिक शास्त्रानुसार उदय तिथीनुसार सोमवार 4 मार्च 2024 ला जानकी जयंती साजरी करण्यात येणार आहे. 

जानकी जयंतीची आख्यायिका 

हिंदू धर्मातील ग्रंथातील आख्यायिकेनुसार मिथिलाचा राजा जनकाच्या राज्यात दुष्काळ पडला होता. तेव्हा त्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी राजा जनकाने आपल्या गुरूंच्या सल्ल्यानुसार सोन्याचा नांगर तयार केला. त्या सोन्याच्या नांगराने राजाने जमीन नांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना मातीच्या भांड्यात एक मुलगी आढळली. अनेक मान्यतेनुसार, नांगरलेली जमीन आणि नांगराच्या टोकाला सीत असं म्हटलं जातं. म्हणून या भांड्यात सापडलेल्या मुलीला सीता असं नाव देण्यात आलं. हा दिवस मिथिलामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

जानकी जयंती किंवा सीता अष्टमी करा हे काम!

जानकी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर माता सीतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी स्नान करून आपल्या घराच्या मंदिरातील देवांची पूजा करा. त्यानंतर व्रताचं संकल्प घ्यावा. प्रभू राम आणि माता सीता यांचं ध्यान करुन संध्याकाळी सीताजी आणि रामजींची एकत्र पूजा करा. मग आरती करून उपवास सोडा. श्रीराम आणि सीताला अर्पण केले नैवेद्य प्रसाद म्हणून अन्नदान करा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)