Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...

Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी आहे. शास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.   

Updated: Feb 1, 2023, 10:50 AM IST
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा... title=
jaya ekadashi 2023 Do not do these things on this day 1 february 2023 otherwise there will be financial loss marathi news

Jaya Ekadashi 2023  : भगवान विष्णूला समर्पित असलेला आजचा दिवस म्हणजे जया एकादशी...माघ महिन्यात येणारी ही जया एकादशी खूप शुभ मानली जाते. हा महिन हिंदू धर्मात देवांचा महिना मानला जातो. या महिन्यात स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. आजच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्याचा आशिर्वाद मिळतो. अशा या इच्छापूर्तीच्या दिवशी आणि अतिशय शुभ दिवशी चुकूनही ही काम करु नका, अन्यथा भगवान विष्णूचा रोष ओढवून घ्याल. (jaya ekadashi 2023 Do not do these things on this day 1 february 2023 otherwise there will be financial loss marathi news)

जया एकादशीला 'हे' करु नका!

1. या दिवशी आपले वर्तन शुद्ध ठेवा आणि तुमचं बोलणेही शुद्ध असू द्या.

2. जेवणात लसूण आणि कांदा वापरु नका. व्रत पाळल नसेल तर आजच्या दिवशी सात्विक अन्न खावे.

3. मांस आणि अल्कोहोलचं सेवन आजच्या दिवशी करु नका. 

4. आजच्या दिवशी दुष्कर्म करु नये आणि कोणाचीही निंदा करु नये. 

5. आजच्या दिवशी कोणाचीही फसवू नका.

6. त्याशिवाय आजच्या दिवशी फसव्या गोष्टींच्या आहारी जाऊ नका. 

7. आजच्या दिवशी सेवेची भावना मनात ठेवा. गरिबांना मगत करा, दानधर्म करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)