Ganpati Murti Rules: हिंदू धर्मात गणपती बाप्पाला आराध्यदैवत म्हटलं जातं. कोणत्याही शुभ कार्यात गणपतीचं प्रथम पूजन केलं जातं. विघ्नहर्त्या गणपतीमुळे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश बाप्पांचा जन्म झाला. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सव दीड दिवसांपासून दहा दिवस चालतो. दहा दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली जाते.
गणपतीच्या स्थापनेनंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात. मोदक, लाडू वगैरे अर्पण केले जातात. गणेश चतुर्थीला बाप्पाला घरी आणण्यापूर्वी मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जाणून घ्या. घरामध्ये बाप्पाची योग्य मूर्ती बसवल्यासच गणपती पूजेचे पूर्ण फळ मिळते.
गणेशमूर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
- ज्योतिषशास्त्रात गणेशाच्या विविध मूर्तींचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. तसेच बाप्पाच्या आकारानुसार वेगळी जागा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी सिंदूर असलेल्या गणेशाची मूर्ती स्थापन करावी. अशा बाप्पाची प्रतिष्ठापना केली तर सकारात्मक परिणाम मिळतात.
- गणपतीची बसलेली मूर्ती घ्यावी. गणेश चतुर्थीच्या वेळी अशा मूर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते. अशा बाप्पाच्या मूर्तीची पूजा केल्याने कायमस्वरूपी लाभ होतो, असे सांगितले जाते.
- वास्तुशास्त्रानुसार बाप्पाची नृत्य करणारी मूर्ती घरात अजिबात आणू नये. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीने असं केलं तर घरात कलह वाढतो. तसेच घरातील शांतता भंग पावते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)