Kaal Bhairav Jayanti: या दिवशी कालभैरव जयंती, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. या तिथीला भगवान शिवच्या कालभैरव रुपाचं उत्पत्ती झाली होती. पौराणिक कथेनुसार, देवी सतीने वडील राजा दक्ष यांच्या यज्ञाच्या हवनकुंडात सती गेली होती.

Updated: Nov 10, 2022, 04:24 PM IST
Kaal Bhairav Jayanti: या दिवशी कालभैरव जयंती, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या title=

Kaal Bhairav Jayanti Puja Muhurat: कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. या तिथीला भगवान शिवच्या कालभैरव रुपाचं उत्पत्ती झाली होती. पौराणिक कथेनुसार, देवी सतीने वडील राजा दक्ष यांच्या यज्ञाच्या हवनकुंडात सती गेली होती. त्यानंतर भगवान शिवांना राग अनावर झाला आणि दक्ष यांना दंडीत करण्यासाठी अंशावतातर कालभैरव रुपात प्रकट झाले. कालभैरवाने राजा दक्षला दंडीत केलं.  या वर्षी कालभैरव जयंती 16 नोव्हेंबरला आहे. या दिवशी ब्रह्म योग तयार होत असल्याने विशेष महत्त्व आहे. कालभैरव तंत्र मंत्राचे देवता आहेत. या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. निशिता मुहूर्तावर त्यांची पूजा केली जाते. कालभैरवाच्या पूजेने नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा नाश होतो. ग्रहदोष, आजार, मृत्यू यांची भीती संपते. 

कालभैरव जयंती तिथी

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी कालभैरव जयंत आहे. या वर्षी 16 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजून 49 मिनिटांनी या तिथीला प्रारंभ होईल आणि 17 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असेल. उदयतिथीनुसार कालभैरव जयंती 16 नोव्हेंबरला साजरी केली जाईल. ब्रह्म योग सकाळपासून रात्री 1 वाजून 9 मिनिटांपर्यंत असेल.

निशिता मुहूर्त

कालभैरवाची निशिता मुहूर्तावर पूजा केली जाते. निशिता मुहूर्त रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. जे लोक सकाळी पूजा करू इच्छितात त्यांनी सकाळी 6 वाजू 44 मिनिटांपासून 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत पूजा करू शकतात. तसेच संध्याकाळी पूजा करण्यासाठी 4 वाजून 7 मिनिटांपासून 5 वाजून 27 मिनिटांपर्यंत आणि रात्री 7 वाजून 7 मिनिटांपासून रात्री 10 वाजून 26 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल. 

Shani Upay: कुंडलीत शनिची खराब स्थिती! अडीचकी आणि साडेसातीमुळे अडचणीत आहात, तर हे उपाय करा

कालभैरव पूजा विधी

सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर कालभैरवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच काळे तीळ, उडीद अर्पण करावं. श्वान हे कालभैरवाचं वाहन आहे. त्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड चपाती द्या. तसेच कालभैरवाष्टकाचं पठण करा आणि ‘ॐ कालभैरवाय नम:’ ची माळ जपा.