'आर्यन'ची झाली 'अनाया'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संजय बांगरच्या मुलाचे PHOTO व्हायरल

Sanjay Bangar Son Story : भारताचे दिग्गज क्रिकेटर, ऑलराऊंडर संजय बांगर यांच्या मुलाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या मुलाने हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन केल्याचे सांगितले जात आहे. 10 महिने सुरु असलेल्या प्रोसेसमध्ये आर्यन आता अनाया झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 11, 2024, 12:55 PM IST
'आर्यन'ची झाली 'अनाया'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संजय बांगरच्या मुलाचे PHOTO व्हायरल title=

भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्याबाबत एक अतिशय रोमांचक गोष्ट समोर आली आहे. हा व्हिडीओ त्याच्या लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दलची आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं की, बांगर यांच्या मुलाचा आर्यनचा मुलगा ते मुलगी होण्याचा प्रवास समोर आला आहे. आर्यन बांगरने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विराट, धोनी आणि वडिल यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहे. तसेच लिंगबदल शस्त्रक्रियेनंतरही काही फोटो पोस्ट केले आहेत. सर्जरीच्या 10 महिन्यानंतर आर्यन आता अनाया झाला आहे. 

वडिलप्रमाणे व्हायचंय क्रिकेटर

आर्यन बांगर देखील आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेटर आहे. डाव्या हाताने खेळणारा फलंदाज असून तो लोकल क्रिकेट क्लब, इस्लाम जिमखान्याकरिता क्रिकेट खेळतो. तसेच त्याने सीलेस्टरशरमध्ये हिंकले क्रिकेट क्लबकरिता खूप सारे रन केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनाया झाल्यावर खूष 

मुलीत रुपांतर होऊन, आर्यन आता अनाया झाल्यावर आनंदी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय आणखी एक प्रवास देखील आहे. जो माझ्या स्वतःच्या शोधाशी निगडीत आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.

मॅनचेस्टरमध्ये राहते अनाया 

अनाया सध्या इंग्लंडमधील मॅनचेस्टरमध्ये राहते. मात्र, ती कोणत्या क्रिकेट क्लबचा भाग आहे हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण, तिच्या इंस्टाग्राम रीलवरून असे दिसून आले आहे की, त्याने तेथे खेळल्या गेलेल्या सामन्यात 145 धावाही केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

सत्याचा करतोय सामना 

अनायाने सांगितलं की, HRT आणि त्यानंतरच्या प्रवास अजिबातच सोपा नव्हता. माझा खेळ माझ्यासाठी सर्वस्व होता. आणि आता तोच खेळ मला आता एका कटू सत्याचा सामना करण्यास भाग पाडत आहे. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) वर एक ट्रान्स वुमन म्हणून, माझ्या शरीरात प्रचंड बदल झाला आहे, मी स्नायू, ताकद आणि ऍथलेटिक क्षमता गमावत आहे. मी एकेकाळी ज्या खेळावर अवलंबून होतो. जो खेळ मला इतके दिवस आवडायचा तो आता माझ्यापासून दूर जात आहे.

सिस्टम मला बाहेर काढतंय

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनाया म्हणाली, "याहून दुःखाची गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांसाठी योग्य नियम नाहीत. असे वाटते की, मला आता यामधून बाहेर पडावं लागेल याला कारण माझी प्रतिभा नाही तर नियम आहेत.  क्रिकेटमधील नियम माझं वास्तव समजून घेण्यात अयशस्वी झाले आहेत. माझ्या टेस्टोस्टेरॉनची पातळी 0.5 nmol वर घसरली आहे, जी सरासरी सिसजेंडर स्त्रीसाठी सर्वात कमी आहे. मला अजूनही माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा माझ्या खऱ्या फॉर्ममध्ये व्यावसायिक स्तरावर खेळण्यासाठी जागा नाही.