Kamada Ekadashi 2023 : आज कामदा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि व्रत पारणाची वेळ

Kamada Ekadashi Date : गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे. आज एप्रिल महिन्याचा पहिला दिवस आणि हिंदू नवर्षातील पहिली एकादशी. खरं तर लोकांनामध्ये संभ्रम आहे की एकादशी आज आहे की उद्या(Kamada Ekadashi 1 or 2 April 2023)...चला जाणून घेऊयात योग्य तारीख आणि पूजाविधी, शुभ मुहूर्त...

Updated: Apr 1, 2023, 06:53 AM IST
Kamada Ekadashi 2023 : आज कामदा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि व्रत पारणाची वेळ  title=
kamada ekadashi 2023 date 1 or 2 April 2023 time puja vidhi vrat parana shubh yoga in marathi

Kamada Ekadashi 2023 Date and mahurat in marathi : म्हणता म्हणता मार्च महिनाही संपला. आजपासून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली. बँकांसाठी नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात. गुढी पाडव्यापासून हिंदू नवं वर्षालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे नववर्षातील पहिली एकादशी, चैत्र महिन्यातील एकादशी कधी आहे असा प्रश्न लोकांना पडला आहे. (kamada ekadashi 2023 date 1 or 2 April 2023  time puja vidhi vrat parana shubh yoga in marathi) 

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं जातं. भगवान नारायणाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हे व्रत केल्यास आयुष्यातील सर्व दुःख नाहीसे होतात. नियमानुसार विधीवत व्रत केल्यास मन आणि शरीराची शुद्ध होते असं म्हणतात. यंदा कामदा एकादशीच्या तिथीबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. कामदा एकादशीची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

कामदा एकादशी 1 किंवा 2 एप्रिल 2023 कधी? (Kamada Ekadashi 1 or 2 April 2023)

धार्मिक मानतेनुसारचैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला कामदा एकादशी येतं. पंचांगानुसार, चैत्र शुक्ल एकादशी तिथी 1 एप्रिल 2023 म्हणजे आज शनिवारी दुपारी 01:58 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 02 एप्रिल 2023 म्हणजे रविवारी पहाटे 04:19 वाजेपर्यंत असेल. 

याचा अर्थ शनिवार आणि रविवार दोन दिवस कामदा एकादशीचं व्रत आला आहे. शास्त्रानुसार जेव्हा एकादशीचं व्रत सलग दोन दिवस असतं तेव्हा स्मार्त संप्रदाय, गृहस्थांनी पहिल्या दिवशी एकादशीचं व्रत करावं, असं सांगितलं आहे. तर संत, साधू आणि वैष्णव पंथाचे लोक यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांनी एकादशीचं व्रत करावं. 

शास्त्रानुसार कुटुंबातील सदस्यांनी म्हणजे आपण सर्वसामान्य भक्तांनी 1 एप्रिल 2023 म्हणजे आज शनिवारी कामदा एकादशीचं व्रत करणं शुभ असणार आहे. 

कामदा एकादशी 2023 व्रत पारण (Kamada Ekadashi 2023 Vrat Parana time)

कामदा एकादशी (1 एप्रिल, 2023) - गृहस्थ जीवन जगणाऱ्यांनी 2 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01:40 ते 4:10 पर्यंत पारायण करावं.

कामदा एकादशी (2 एप्रिल 2023) - वैष्णव संप्रदाय, साधू, संतांनी 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी 06:09 ते 06:24 पर्यंत पारायण करावं. 

कामदा एकादशी व्रताची पद्धत  (Kamada Ekadashi Puja)

एकादशीच्या दिवशी साधकाने स्नान वगैरे करून श्री विष्णूची मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी.  
यानंतर एकादशी व्रताचा संकल्प करावा.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा.
त्यावर चंदन, फुलं, फळं आणि अगरबत्ती अर्पण करावी. 
दिवसभर वेळोवेळी भगवान विष्णूचं स्मरण करावं.
एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत 24 तासांचा उपवास करावा.  
दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला अन्न आणि काही 'दक्षिणा' दिल्यानंतर उपवास सोडावा. 

कामदा एकादशीच्या दिवशी काय करावे?

कामदा एकादशीचे व्रत फळ आणि निर्जल अशा दोन्ही प्रकारे करु शकता. मान्यतेनुसार एकादशीचे व्रत सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवावे.
या दिवशी दुपारी झोपू नका आणि त्याच वेळी रात्री जागृत राहून भगवान नारायणाचं स्मरण करा, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)