close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शनिवार | 21 सप्टेंबर 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Sep 21, 2019, 08:43 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | 21 सप्टेंबर 2019

मेष- बेरोजगारांसाठी दिवसात चांगली बातमी येऊ शकते. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. नात्यांमध्ये चांगला काळ येईल. स्वत:ची प्रतिमा आणखी चांगली करण्याच्या दिशेने पावलं उचलाल. दिवस उत्साही असेल. कौटुंबीक कामांमध्ये व्यग्र राहाल. जुने आजार दूर होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. 

वृषभ- ऑफीसमध्ये काम खूप असेल. कामात व्यग्र असाल. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनतीने अर्थार्जन कराल. काळ चांगला आहे. सावध राहा. एकाच वेळी विविध क्षेत्रांमध्ये व्यग्र असाल. पुढे जाण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. प्रवासाचा योग आहे. शारिरीक नाही पण किरकोळ त्रास जाणवेल.

मिथुन- व्यवसाय आणि नोकरीमध्ये परिवाराचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचार करुन बोला. घाईने कोणतंही काम करु नका. पैसे जपून वापरा, वायफळ खर्च होऊ शकतात. नोकरी आणि व्यापारात अडचणी वाढतील. आरोग्याविषयी निष्काळजीपणा नको. मित्र आणि कुटुंबाच्या व्यापात अडकलेले असाल. पोटाचे विकार होऊ शकतात. 

कर्क- नव्या व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरीमध्ये बदलाच्या संधी आहेत. इनकम वाढेल. कोणती तरी जुनी योजना अचानक आठवेल. व्यवहारकुशलतेमुळे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून सन्मान मिळेल. जुन्या आजारांपासून मुक्तता मिळेल. काहीतरी नवे करण्याची इच्छा होईल. 

सिंह- व्यवसायात नव्या योजना बनवाल. अडकलेला पैसा मिळेल. कोणाकडून उधारी घ्यायची वेळही येईल. कुटुंबात सुख- शांती असेल. कामाच्या ठिकाणी नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामांमध्ये यश मिळेल. तुमचं लक्ष कोणा एका दुसऱ्या गोष्टीवर असेल. नोकरीच्या ठिकाणी कोणीतरही व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करत असेल. आर्थिकदृष्ट्या साथीदाराची मदत होईल. 

कन्या- भावनिक होऊन नोकरी आणि व्यवसायातील निर्णय घेऊ नका. काही जुने वाद समोर येतील. मानसिक ताण वाढेल. कनिष्ठांकडून मदत मिळेल. काही खास व्यक्तींना भेटण्याचा योग. दैनंदिन कामांतून काही वेळासाठी उसंत मिळेल. अपूर्म कामं पूर्णत्वास जातील. तुम्हाला त्याचा फायदा होईल. वाहने सावकाश चालवा.  

तुळ- कर्जातून मुक्ती मिळेल. आपल्या कामावर लक्ष ठेवा. काही नवे आणि सकारात्मक काम कराल. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. दिवस चांगला आहे. प्रगती आणि फायद्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. नशीबाची साथ असेल. कोणालाही न दुखावता चतुराईने काम करा. 

वृश्चिक- व्यापारात फायदा कमी होईल. तुमचे काही खास काम पूर्ण होईल. व्यक्तिगत समस्या दूर होतील. बदलीची शक्यता आहे. नवं काही सुरू करण्यावर भर द्या. दिवस आव्हानात्मक असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. समाज आणि कुटुंबात तुमचं महत्त्वं वाढेल. तब्येतीत चढउतार होऊ शकतात. जेवणात मसालेदार पदार्थ टाळा. 

धनु- नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. विनाकारण धावपळ करु नका. दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. विचारपूर्वक निर्णय घेण्याचा फायदा होईल. समाज आणि कुटुंबात महत्त्व मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. साथीदारासोबतच चांगला काळ व्यतीत कराल. 

मकर- नवे करार आज करु नका. पैसे अडकण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात ठीक असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातीलच सदस्य तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. काही बेत आखत असाल तर ते सध्या कोणाला सांगू नका. जास्त जेवणाने त्रास जाणवू शकतो. जेवणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. येणारे पैसे आणि होणारा खर्च संतुलित असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. पूर्ण ताकदीने कामं पूर्णत्वास न्याल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांची सोबत फायग्याची ठरेल. प्रयत्नांनी अडचणींवर तोडगा काढाल. कोणत्यातरी खास निकालाच्या प्रतीक्षेत आहात. संयम धेवा, धीर राखा आनंदच मिळेल. 

मीन- आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. काही छोट्या कामांमुळे त्रास जाणवेल. भावनेच्या भरात येऊन गुंतवणूक करु नका. व्यापार न वाढवण्याचा निर्णय चांगला ठरेल. जे चाललं आहे ते तसंच चालूद्या. महाग वत्सूंची खरेदी कराल. आज कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. प्रेम, नात्यांच्या बाबतीत दिवस चांगला आहे.