close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २० सप्टेंबर २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Sep 20, 2019, 07:41 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २० सप्टेंबर २०१९
संग्रहित छायाचित्र

मेष- नव्या लोकांची भेट घडण्याचा योग आहे. तुम्हाला इतरांची मदत होईल. इतरांकडून सहानुभूती मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. जुन्या मित्रांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळण्याची चिन्हं आहेत. 

वृषभ- नोकरदार वर्गाची परिस्थिती सुधारेल. तुम्हाला मोठा फायदा होण्याची चिन्हं आहेत. पुढे जाण्याच्या संधी मिळतील. सोबत काम करणाऱ्यांच्या वाट्याला यश मिळेल. 

मिथुन- विचार करुनच कोणताही निर्णय. पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमचं विश्व विस्तारेल. जितकी मेहनत कराल त्यात यशस्वी व्हाल. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्याचा योग आहे. 

कर्क- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा उत्साह वाढलेला असेल. पैशांच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. मोठ्या निर्णयांसाठी दिवस चांगला आहे. 

सिंह- मोठी कामं आटोपण्यावरच तुमचं लक्ष असेल. पैसे आणि आत्मविश्वास आजही वाढलेला असेल. अनेक अनुभव तुम्हाला मिळतील. बऱ्यापैकी सक्रिय असाल. नव्या नोकरीची रुपरेषा आखाल. 

कन्या- ज्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा. इतरांपासून प्रेरणा मिळेल. एखादी नवी गोष्ट शिकाल. नोकरीच्या ठिकाणी काही नवे बदल होण्याची शक्यता आहे. 

तुळ- आज तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल. भावना व्यक्त केल्यास समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचतीलही. कोणा एका खास व्यक्तीचा सल्ला तुम्हाला फायद्याचा ठरेल. 

वृश्चिक- चांगल्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत होऊ शकतो. जबाबदारीवर लक्ष द्या. कौटुंबीक वातावरणात आनंद असेल. 

धनु- तुमच्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त कराल. कौटुंबीक प्रश्नांवर चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. 

मकर- लहानमोठे प्रवासयोग आहेत. काही खास व्यक्ती तुमचं काम पाहून दाद देतील. जास्त मेहनतीची कामं करावी लागू शकतील. एखादी शुभवार्ता कळेल. 

कुंभ- अनेकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी तुम्हाला मिळेल. जवळपासच्या व्यक्तींवर लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीची कामं करावी लागतील. कुटुंबासोबत एखाद्या शुभकार्यात सहभागी व्हाल. 

मीन- स्वत:वर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त कामांमध्ये तुम्ही यशस्वी ठराल. अर्थार्जनाची चांगली संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या जास्त विचार कराल.