मेष- बेरोजगारांसाठी दिवसात चांगली बातमी येऊ शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळेल. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. नात्यांमध्ये चांगला काळ येईल. स्वत:ची प्रतिमा आणखी चांगली करण्याच्या दिशेने पावलं उचलाल. दिवस उत्साही असेल. कौटुंबीक कामांमध्ये व्यग्र राहाल. जुने आजार दूर होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ- तुमच्या बोलण्याचा इतरांवर परिणाम होईल. ऑफीसमध्ये काम खूप असेल. कामात व्यग्र असाल. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनतीने अर्थार्जन कराल. काळ चांगला आहे. सावध राहा. एकाच वेळी विविध क्षेत्रांमध्ये व्यग्र असाल. पुढे जाण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. प्रवासाचा योग आहे. शारिरीक नाही पण किरकोळ त्रास जाणवेल.
मिथुन- व्यवसाय आणि नोकरीमध्ये परिवाराचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचार करुन बोला. घाईने कोणतंही काम करु नका. पैसे जपून वापरा, वायफळ खर्च होऊ शकतात. असे केल्यास पैशांची स्थिती सुधारु शकते. नोकरी आणि व्यापारात अडचणी वाढतील. आरोग्याविषयी निष्काळजीपणा नको. मित्र आणि कुटुंबाच्या व्यापात अडकलेले असाल. पोटाचे विकार होऊ शकतात.
कर्क - रखडलेला पैसा हातात येईल. या परिस्थितीत त्याचा खूप मोठा आधार असेल. संकटातून बाहेर पडण्यास मित्र परिवार मदत करेल. ठरवलेली आणि मनात असलेली काम आता पूर्ण करा. आज तुम्हाला चांगल वाटेल. सामूहिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान असणं आवश्यक आहे.
सिंह - आपल्या अपेक्षांना या काळात संतुलित ठेवा. शांत राहणं हा एकच उपाय आहे. ऑफिसच्या कामातील तणावाची परिस्थिती संपणार आहे. मेहनत आणि समजुतदारपणाच कामाला येणार आहे. आजचा दिवस खास आहे. काही अशा गोष्टी समोर येतील ज्यामुळे बळ मिळेल. शांत राहा.
कन्या - कामात नवीन प्रयोग करण्यासाठी आताच प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जोडीदाराची साथ लाभेल. नोकरी, करिअर आणि पैसा या गोष्टींचा फार विचार न करता जगणं किती महत्वाचं आहे. याचा विचार कराल. हे ही दिवस जाणार आहेत.
तूळ- एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल, मेहनत करावी लागेल. मात्र, एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल.
वृश्चिक- तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.
धनु- कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील.
मकर- आज मानसिक आणि शारिरिक बाबतीत थकवा जाणवेल. तुमच्या कामापासून मागे हटू नका. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवाल. कामाचा व्याप वाढेल. परिणाम तुमच्या बाजूने असतील. दिवसभरात उत्साही राहाल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. धनलाभ होण्याची संधी. कुटुंबाची मदत होण्याची चिन्हं.
कुंभ- कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तुमच्यातील सकारात्मक शक्तीने खूप काही मिळवू शकाल. नव्या जबाबदाऱ्या हाती येतील. कठिण परिस्थितीत तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तींकडून मदतीचा हात मिळेल. घर बदलण्याची इच्छा होईल. जमीन, संपत्तीविषयी महत्त्वाचे निर्णय होतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता.
मीन- करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आज व्यवसाय नाही वाढवलात तर चांगल ठरेल. कामकाज आणि व्यवसायावर लक्ष केंद्रीत कराल. काही नवं करण्याचा मनसुबा असेल. कुटुंबाची मदत होईल. कुटुंबाच्या कलाने घ्या फायदा होईल. मन आणि बुद्धीवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल. दम लागून झोपावसं वाटेल.